How to get rid of laziness? Why we feel sleepy even after the sleep of 8 hours at night?
७- ८ तास झोपूनही झोप झाल्यासारखीच वाटत नाही, आळस जातच नाही? ५ उपाय, वाटेल फ्रेश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 06:03 PM2022-08-30T18:03:15+5:302022-08-30T18:09:01+5:30Join usJoin usNext १. खूप थकवा आला असेल तर किंवा ज्यादिवशी खूप काम होतं त्यादिवशी असं वाटत असेल, तर समजण्यासारखं आहे. पण असं वारंवार होत असेल. रात्री ७- ८ तास झाेपूनही झोप झाल्यासारखीच वाटत नसेल तर त्यासाठी काही उपाय नक्कीच केले पाहिजेत. २. खूप थकवा किंवा खूप काम असं कोणतंही कारण नसताना जर वारंवार झोप- झोप होत असेल, आळस येत असेल तर तुमच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अधिक झालं आहे हे ओळखावं. ३. हा त्रास कमी करण्यासाठी आणि दिवसभर फ्रेश, उत्साही वाटण्यासाठी हे काही घरगुती उपचार करून बघा. ४. आठवड्यातून २ वेळा सगळ्या अंगाला काेमट तेलाने मसाज करा. यामुळे शरीरावरील डेड स्किन तसेच स्नायूंमधील थकवा निघून जाण्यास मदत होते. ५. कितीही थकवा आला तरी सकाळी लवकर उठा आणि फ्रेश हवेत जाऊन अर्धा तास तरी वॉकिंग करून या. चालण्याचा व्यायाम निश्चितच मन आणि शरीर फ्रेश करण्यास मदत होते. ६. सकाळी लवकर उठून प्राणायाम आणि व्यायाम करणेही फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स निघून जाण्यास मदत होते. शरीरातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते आणि अधिकाधिक फ्रेश वाटू लागते. ७. आहारात शिळ्या पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असेल तरी आळस येण्याचं प्रमाण वाढू शकतं. ८. तसेच रात्री खूप उशिरा जेवत असाल आणि जेवणात मसालेदार, जड पदार्थ, जंकफूड यांचं प्रमाण जास्त असेल तरीही त्यामुळे शांत झोप लागत नाही आणि मग भरपूर झोपूनही झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यFitness TipsHealth