सहलीला जायचंय पण प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2024 04:26 PM2024-04-13T16:26:19+5:302024-04-13T16:38:23+5:30

प्रवासात अनेक जणींना मळमळ- उलट्यांचा त्रास होतो. यालाच बोली भाषेत बस लागणे किंवा गाडी लागणे असं म्हणतात.

प्रवासात हा त्रास झाला तर आपला सहलीचा सगळा आनंद तर जातोच, पण आपल्यासोबत जे प्रवास करणारे असतात, त्यांनाही त्रास होतो. त्यामुळे मग अनेकजणी आवड असूनही प्रवास करणं टाळतात.

तुम्हालाही प्रवासात मळमळ- उलट्या असा त्रास होत असेल तर आलिया भट, करिना कपूर यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेला हा एक अगदी सोपा उपाय करा.

अंशुका यांनी याविषयीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्यांनी प्रवासादरम्यान शुन्य मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. ही मुद्रा करण्यासाठी शांत, रिलॅक्स बसा. दोन्ही हातांचे मधले बोट खाली वाकवा आणि अंगठ्याने मधल्या बोटाच्या नखाच्या थोड्या वरच्या भागात दाब द्या.

यामुळे मळमळ- उलट्या असा त्रास जाणवणार नाही. प्रवासादरम्यान हा उपाय तर कराच. पण प्रवास सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्या.

ज्यादिवशी प्रवास सुरू करणार आहात, त्याच्या आधीच्या रात्री लवकर झोपा. जास्त जागरण करू नका.

तसेच प्रवासाच्या आधीच्या दिवशी किंवा प्रवासाला सुरुवात करण्यापुर्वी मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ किंवा खूप जास्त प्रमाणात आंबट पेय, सरबत पिणे टाळा. हलका- फुलका आहार घेऊन प्रवासाला सुरुवात करा.