How to Get Rid Of Painful Memories Gour Gopal Das Tips To Forget Bad Memories
वाईट आठवणी कशा विसरायच्या? गौर गोपाल दास सांगतात १ सोपी ट्रिक, कडवटपणा टाळून आनंदाने जगा By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 08:36 PM2024-07-17T20:36:30+5:302024-07-18T17:38:24+5:30Join usJoin usNext How to Get Rid Of Painful Memories आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग आणि वेदनादायक अनुभव विसरणं खूपच कठीण असते. लोक नेहमीच आधी घडलेल्या वाईट गोष्टी आठवून दु:खी होतात. या गोष्टी विसरणं सोपं नाही. अनेक वर्ष लोक आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात पण काही गोष्टी विसरू शकत नाहीत. (How to Get Rid Of Painful Memories Gour Gopal Das Tips To Forget Bad Memories) तुम्हीसुद्धा याच प्रसंगातून जात असाल तर मोटिव्हेशल स्पिकर गौर गोपाल दास यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण यात गौर गोपाल दास यांनी वाईट प्रसंगातून बाहेर येण्यासाठी उपाय सांगितले आहेत. गौर गोपाल दास सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या भूतकाळातील चांगल्या, वाईट दोन्ही प्रकारच्या आठवणी असतात काही लोक ते वारंवार आपला भूतकाळ आठवून चिंतेत असतात. जर काहीजण या आठवणी विसरून पुढे निघून जातात. भूतकाळातून बरेच लोक पूर्णपणे बाहेर येत नाहीत. ज्यामुळे त्यांना गंभीर मानसिक असंतुलनाचा सामना करावा लागतो. तुम्हीसुद्धा वाईट गोष्टीतून बाहेर येत नसाल तर चांगल्या गोष्टी आठवा. माणूस टॉफीज आनंदाने खातो आणि औषधं पाण्यासोबत घेतो पण जीवनात हे सर्व उलटं होतं. व्यक्ती वाईट आठवणी लक्षात ठेवतो आणि चांगल्या आठवणी विसरतो. असे न वागता वाईट आठवणींपासून सुटका मिळवण्यासाठी स्वत:ला बिझी ठेवायला हवं. कोणत्याना कोणत्या कामात बिझी असल्यास तुम्ही वाईट आठवणींतून बाहेर येऊ शकता. याव्यतिरिक्त योगा, मेडिटेशन, व्यायाम करून तुम्ही वाईट आठवणी विसरू शकता. टॅग्स :मानसिक आरोग्यMental Health Tips