उष्णतेमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? ५ पदार्थ खाणं सोडा, पुळ्या-डाग दिसणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 06:54 PM2024-05-21T18:54:25+5:302024-05-22T15:02:23+5:30

How To Get Rid Pimples : तळलेले, भाजलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. अन्यथा चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत स्किनशी संबंधित समस्या सतत जाणवतात. धूळ, माती, घाम आल्यामुळे चेहऱ्यावरचे पोर्स बंद होतात. याव्यतिरिक्त शरीरात हॉर्मोनल बदल्ससुद्धा दिसतात ज्यामुळे पिंपल्स येतात

पिंपल्सचा धोका टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात तरीही चेहऱ्यावर ग्लो येत नाही. खाण्यापिण्यात चुकीच्या पदार्थांचा समावेश केल्यास पिंपल्स येणं सुरू रराहतं. पिंपल्सपासून बचावासाठी काही पदार्थांचे सेवन टाळायला हवे.

चिप्स, फ्रेंच फ्राईज, बर्गर, पिज्जा हे फास्ट फूड तेल आणि साखरयुक्त असतात ज्यामुळे पिंपल्स जास्त प्रमाणात येतात.

चॉकलेट्समध्ये फॅट आणि शुगरचे प्रमाण जास्त असते. जे स्किनसाठी अजिबात चांगले नाही. पिंपल्सपासून बचावासाठी चॉकलेट जास्त खाऊ नका.

डेअरी प्रोडक्ट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. डेअरी प्रोडक्ट्समध्ये लॅक्टोज आणि फॅट जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते.

तळलेले, भाजलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. अन्यथा चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत.

कॅफेनयुक्त पदार्थांचे कमीतकमी प्रमाणात सेवन करा. असे पदार्थ जास्त घेतल्यास पिंपल्स कमी होत नाहीत.