रात्री लवकर झोपच येत नाही? ग्लासभर दूधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ढाराढूर शांत झोपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 05:34 PM2023-09-22T17:34:16+5:302023-09-23T13:30:18+5:30

How to Get Sleep Faster : गरम दूधात जायफळ घालून प्यायल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते एक्सपर्ट्सच्या मते रात्री झोपण्याआधी गरम दूधात जायफळ पावडर घालून प्यायल्याने झोप लवकर येते.

दिवसभर काम केल्यानंतर लोक दमून रात्री झोपतात. पण अनेकांना कितीही थकवा आला तरी रात्री लवकर झोपच येत नाही. जर तुम्हालाही रात्री लवकर झोप येत नसेल तर तुम्ही याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण व्यवस्थित झोप झाली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. रोगप्रतिकारकशक्तीवर याचा परिणाम होतो.

रात्री व्यवस्थित झोप आली नाही तर पूर्ण दिवस कंटाळवाणा वाटतो आणि फ्रेश वाटत नाही. डॉक्टर अमित मिगलानी यांनी झोप न येण्याची समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत.

आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये असे अनेक पदार्थ असतात जे औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे जायफळ. जायफळ झोप न येण्याची समस्या टाळण्यास फायदेशीर ठरते. एक्सपर्ट्सच्यामते जायफळमध्ये आवश्यक मिनरल्स असतात ते नर्व्हस सिस्टीमला आराम देतात

शरीरात सेरोटोनिन स्टिमुलेट करतात. सेरोटोनिनि हॅप्पी हॉर्मोन म्हणून ओळखला जातो. यामुळे एंग्जायटी आणि स्ट्रैस दूर होण्यास मदत होते.

गरम दूधात जायफळ घालून प्यायल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते एक्सपर्ट्सच्या मते रात्री झोपण्याआधी गरम दूधात जायफळ पावडर घालून प्यायल्याने झोप लवकर येते.

झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. किसलेलं ताजं जायफळ दूधाच्या पावडरमध्ये घालून प्या. उकळत्या दूधात ही पावडर घालून एकत्र करा त्यानंतर गॅस बंद करून या दूधाचे सेवन करा एक कप पाण्यात जायफळ पावडर घालून व्यवस्थित उकळून घ्या.

थंड झाल्यांतर गाळून या दूधाचे सेवन करा. याशिवाय झोपण्याआधी तासनातास फोन वापरणं टाळा. रोज झोपायची वेळ निश्चित ठेवून त्याचवेळी झोपा.