केस कोरडे-झाडूसारखे झालेत? हंसाजी योगेंद्र सांगतात ३ उपाय, लांबचलांब, घनदाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:30 PM2024-11-11T19:30:31+5:302024-11-11T19:44:00+5:30

How To Get Thicker Hair 3 Home Remedies : तिसरा उपाय आहे सर्वांगन. यामुळे केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते.

केस वाढवण्याबाबत अनेक मुली चिंतेत असतात (How To Get Thicker Hair). कारण वेगवेगळ्या उत्पादनांच्या वापरामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढलं आहे. केस वाढत तर नाहीच पण आहेत ते तुटतात. (Home Remedies Hair Care Tips)

केस गळणं, केसांमध्ये कोंडा होणं, केस न वाढणं, पांढरे केस या समस्येमुळे आजकाल प्रत्येकजण त्रस्त आहे.

अलिकडेच डॉ. हंसजी योगेंद्र यांनी एका पॉडकास्टमध्ये केसांच्या आरोग्याबाबत महत्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. त्यांना केस वाढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आलात त्यावर त्या म्हणाल्या की, केस वाढवण्यासाठी मी केसांचा व्यायाम करण्याबाबत सल्ला देईन.

एक मोठा कंगवा घ्या आणि पुढच्या बाजूनं वाका. नंतर कंगवा मागे पुढे फिरवा. ज्याला बॅक कोम्बिंग असंही म्हणतात. २ ते ३ मिनिटं ही व्यायाम केल्यानं केसांची मुळं आणि सेल्स मजबूत होतील.

दुसरी पद्धत आहे पुलिंग ऑफ हेअर म्हणजेच आपल्या बोटांनी केस पकडून केसांना हळूच खेचा.

तिसरा उपाय आहे सर्वांगन. यामुळे केसांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते.

याशिवाय केस जास्तवेळ ओले ठेवू नका. केस नेहमीच सुकवून सेट करा. ओल्या केसांमुळे मुळं कमकुवत होऊन केस तुटण्याचं प्रमाण वाढू शकतं.