आयब्रो खूप बारीक, विरळ लहान झाल्या आहेत? दाट- भरीव दिसण्यासाठी काय करायचं? By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 05:22 PM 2023-01-12T17:22:03+5:30 2023-01-12T17:32:14+5:30
How to Grow Thicker Eyebrows? - आयब्रो विरळ होतात, लहान दिसतात, त्या पुन्हा दाट आणि सुंदर दिसण्यासाठी काय करावे? चेहरा रेखीव आणि आकर्षक दिसण्यामागे डोळ्यांप्रमाणेच भुवयाही महत्त्वाच्याच असतात. जाड आयब्रोज असलेल्या मुली खूपच कॉन्फिडंट, सुंदर दिसतात. भुवया जाड, भरीव दिसण्यासाठी बाजरात अनेक महागडी उत्पादनं, ट्रिटमेंट्स बाजारात उपलब्ध आहेत. (How to grow eyebrows naturally?) पण त्या ट्रिटमेंट्स प्रत्येकालाच परवडतील असं नाही. आयब्रोज खूप पातळ असतील तर आयब्रोच्या केसांची वाढ होण्यासाठी आणि योग्य आकारात आयब्रोज येण्यासाठी काही सोपे उपाय.(How to Grow Thicker Eyebrows?)
एरंडेल तेल भुवयांना एरंडेल तेल लावा. हे तेल केसांची वाढ करेत आणि केस जाड आणि मजबूत बनवते. हे तेल प्रथिने, फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे समृध्द आहे, त्यामुळे ते केसांच्या मुळांचे पोषण करण्यास मदत करते.
नारळाचं तेल नारळाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म असतात. डोक्यावरच्या केसांप्रमाणेच आयब्रोजच्या केसांसाठीही ते फायदेशीर ठरतात. काळ्या, मोठ्या आयब्रोजसाठी नारळाच्या तेलानं मसाज करा.
जर तुमचे आयब्रोज पातळ असतील तर झोपण्याआधी आयब्रोजवर ऑलिव्ह ऑईल लावून जवळपास ५ ते १० मिनिटं केसांना मसाज करा. यामुळे केसांची वाढ जलद गतीनं व्हायला मदत होईल आणि केसांची वाढ चांगली होईल.
कांद्याचा रस कांद्याचा रस डोक्यावरच्या केसांच्या वाढीप्रमाणेच आयब्रोच्या केसांच्या वाढीसाठीही फायदेशीर ठरतो. हा रस आयब्रोजच्या केसांना लावल्यास केस काळपट आणि दाट होण्यास मदत होते.
एलोवेरा जेल दाट, काळ्या आयब्रोजसाठी एलोवेरा जेलनं मसाज करा. एलोवेरा जेलनं दिवसातून २ वेळा हलक्या हातानं मसाज केल्यास आयब्रोज दाट होण्यास मदत होईल.
कच्चं दूध एक चमचा कच्चं दूध कापसाच्या मदतीनं आयब्रोजवर लावा. आयब्रोची वाढ होण्यासाठी तसंच ते काळे आणि शायनी दिसण्यासाठी कच्च्या दुधानं मसाज करा.
काळजी कशी घ्याल? १) नाकाच्या मधोमध आयब्रो लाईन असावी, आयब्रोज जास्त लहान असू नये. तर चेहऱ्याचा आकार ओव्हल शेपमध्ये असेल तर आयब्रो आर्च किंवा थोड्या लांब असाव्यात. आयब्रोजना शेप देण्यासाठी तुम्ही मस्कारा स्टिकचा वापर करू शकता. जर तुम्हाला आयब्रोज जास्त जाड हवे असतील तर काळ्या पेन्सिलऐवजी ब्राऊन पेन्सिलची निवड करा. हलक्या हातानं पेन्सिल फिरवा. पेन्सिल फिरवताना जास्त डार्क, आर्टिफिशियल वाटणार नाही याची काळजी घ्या.
२) आयब्रो पेन्सिल फिरवल्यानंतर ब्रशनं आयब्रोचे केस शेपमध्ये विंचरा.
३) आयब्रोजचे केस चिमटा किंवा वॅक्सनं काढू नका. रोज पुरेसं पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. रोज कमीत कमी ८ ते ६ तासांची झोप घ्या.