घरात येताच उकडतं-गरम झळा लागतात? १ ट्रिक, एसी-कुलर न लावता थंड हवेशीर राहील खोली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:21 PM2024-05-09T15:21:58+5:302024-05-09T18:17:32+5:30

How To Keep Home Cool : गरमीच्या दिवसांत पडदे लावल्याने आरामदायक वाटू शकते. म्हणून घरात पडदे लावायला विसरू नका

वाढत्या गरमीमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. दिवसभरात घरात आणि घराबाहेरही इतकं ऊन लागतं की घरात राहणंसुद्धा कढीण होतं. अशा स्थितीत दिवसरात्र कुलर, पंखा किंवा एसी लावून झोपावे लागते.

ऊन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढतं अशावेळी कुलर लावूनही काही उपयोग होत नाही घरात गरम वाफा येऊ लागतात.

एसी आणि कुलरशिवाय खोली थंड ठेवण्याासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स फोलो करू शकता. ज्यामुळे घराचं वातावरण गार राहील.

घराच्या बाहेरच्या भिंतीवर हिट प्रूफ पेंट केल्यानं तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे गरमी शोषून घेतली जाते आणि घराच्या भिती कमीत कमी गरम होतात.

गरमीच्या दिवसांत पडदे लावल्याने आरामदायक वाटू शकते. गडद पडदे लावल्याने सन लाईटबरोबरच गरम हवा खोलीत येणार नाही आणि खोलीचे तापमान कमी राहील.

घरात मोठमोठे प्लांट ठेवल्याने गरमी कमी होण्यास मदत होते. झाडांमुळे खोलीच्या आतील तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. प्लांट्समुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि घरातील वातावरणही चांगले राहते.

(Image Credit-Social Media)