ओटी पोट सुटलंय-पोटावर कपडे घट्ट बसतात? झोपण्याआधी ३ गोष्टी करा-झरझर घटेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 02:14 AM2023-12-10T02:14:00+5:302023-12-10T02:15:02+5:30

How to loss belly Fat Naturally :

पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक बरीच मेहनत करतात कोणी जीमला जातं तर कोणी वेट लॉस डाएट प्लॅन फॉलो करतं. आजकाल पोट बाहेर येणं, लठ्ठपणा, वजन वढणं हे खूपच कॉमन झालंय. (Night routine for Weight Loss)

अनेकजणांना वजन कमी करण्याची योग्य पद्धत माहीत नसते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही वर्कआऊट रुटीनकडे लक्ष द्यायला हवं. त्याबरोच खाण्यापिण्याचे नियमही लक्षात घ्यायला हवेत.

लाईफस्टाईलमध्ये काही सोपे बदल करून तुम्ही वजन कमी करू शकता. झोपण्याच्या आधी तुम्ही काय करता हे वजन कमी करण्यासाठी फार महत्वाचे असते.

रात्रीचे जेवण वेळेवर करणं गरजेचं असतं. रात्री उशीरा जेवल्याने मेटाबॉलिझ्म स्लो होतो याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते. जर तुम्ही पोट कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रात्री लवकर जेवण्याचा प्रयत्न करा.

रात्रीचे जेवण नेहमीच हलकं असावं. रात्री पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करा. वजन कमी करण्यासाठी पचायला हलके पदार्थ खा.

रात्री झोपण्याआधी ग्रीन टी किंवा पेपरमिंट टी सेवन केल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो आणि हे हेल्दी ड्रिंक आपली पचनक्रिया चांगली ठेवते.

रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाल्ले तर तर पचायला वेळ लागू शकतो. दिवसभरात तुम्ही योग्य प्रमाणात साखरयुक्त पदार्थ खाऊ शकता पण रात्री खाऊ नका.