बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचंय? रोज 'हे' फळं खा; हार्ट सांभाळा आणि आयुष्यही वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:33 IST2023-10-06T09:38:00+5:302023-10-06T15:33:17+5:30

How to lower cholesterol : सफरचंद आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करतो. रिसर्चनुसार रोज एक किंवा दोन फळं खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते.

कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या सध्या तरूणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येचे दिसून येते. फिजिकल एक्टिव्हीटीजचा अभाव जंक फूड जास्त प्रमाणात खाणं यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल वाढते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढलं तर धमन्यांमध्ये रक्त जमा होतं.

शरीरात रक्त प्रवाहावर परिणाम होतो. हार्ट अटॅक, स्ट्रोक यांसारख्या गंभीर स्थितीतून जावे लागते. वेळीच कोलेस्टेरॉल जमा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नैसर्गिक उपायांनी आणि आहारावर नियंत्रण ठेवून कोलेस्टेरॉल कंट्रोल करणं गरजेचं आहे.

त्यासाठी डाएट, नियमित फिजिकल एक्टिव्हीटज आणि हेल्दी लाईफस्टाईल असायला हवी. काही फळं अशी आहेत ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते.

सफरचंद आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करतो. रिसर्चनुसार रोज एक किंवा दोन फळं खाल्ल्याने कोलेस्टेरॉल लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार रोज सफरचंद खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. सफरचंदा बायोएक्टिव्ह पॉलफेनॉल्स असतात. ही पोषक तत्व बॅड कोलेस्टेरॉल कमी करतात. याशिवाय सफरचंद खाल्ल्याने शरीरातील लिपिड मेटाबॉलिझ्म आणि कार्डिओवॅस्कुलर हेल्थसुद्धा चांगली राहते.

२०१२ मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार ४ आठवडे दिवसाला एक किंवा दोन सफरचंद खाल्ल्याने बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. सफरचंदाचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्टेरॉल ४० टक्क्यांनी कमी झालेले दिसून आले होते.

रोज सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासत नाही.