How to maintain formal professional look in office? 10 tips, look smart and beautiful
ऑफिसात गबाळं न जाता एकदम टिपटॉप फॉर्मल दिसण्यासाठी १० टिप्स, मिटिंग असो की प्रेझेण्टेशन दिसा स्मार्ट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 02:08 PM2022-05-27T14:08:06+5:302022-05-27T14:28:30+5:30Join usJoin usNext १. ऑफिसमध्ये फॉर्मल कपड्यांत, अपटूडेट जाणं हा केवळा आता शॉ ऑफ राहिलेला नाही. ती गरज झाली आहे. आपले कपडे स्वच्छ, टापटिप, इस्त्री केलेले आणि ऑफिसच्या वातावरणाला सूट होणारे असले की आपोआपच आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि मग त्याचा कामावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. २. फाॅर्मल लूकसाठी ऑफिसमध्ये साडी नेसणार असाल तर बिंधास्त नेसा. पण त्यासाठी साड्यांची निवड मात्र एकदम सोबर हवी. लिनन, कॉटन साड्या ऑफिससाठी जास्त योग्य आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा रंगही खूप भडक नसावा. ३. ब्लाऊज शक्यतो अशा पद्धतीचे बंद गळ्याचे, स्टॅण्ड कॉलर असावे. मोठ्या गळ्याचे ब्लाऊज ऑफिसमध्ये नकोच. ४. तुमचा फॉर्मल लूक कम्प्लिट व्हावा, म्हणून एक छोटीशी वस्तू खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. ती म्हणजे हातातली घड्याळ. ऑफिस, इंटरव्ह्यू किंवा मिटींग असं कुठेही जाताना हातात घड्याळ हवेच.. ते सुद्धा एकदम डिसेंट. ५. तुम्हाला चष्मा असेल तर ऑफिसवेअरसाठी वेगळा आणि कॅज्यूअल लूकसाठी वेगळा असे दोन चष्मे कॅरी करा. ऑफिसमधला चष्मा शक्यतो रिमलेस किंवा सॉलिड फ्रेम प्रकारातला असावा. लाल, निळे, पिवळे अशा फंकी रंगाचे चष्मे ऑफिसमध्ये लावणं टाळा ६. तसेच गळ्यात, कानात, हातात काही ॲक्सेसरीज घालणार असाल तर त्यादेखील अतिशय सोबर असाव्या. त्यांच्याकडे लक्ष जावं इतक्या त्या आकर्षक नक्कीच असाव्या. पण लगेचच डोळ्यात खुपतील किंवा तुम्हाला काहीतरी ऑड लूक देतील अशा चमचमणाऱ्या किंवा हेवी नसाव्यात. ७. तसंच काहीसं मेकअपचं. ऑफिसला जाताना शक्यतो न्यूड मेकअप करावा. लिपस्टिकचा रंगही अतिशय लाईट निवडा. आय मेकअप करतानाही तो ब्लॅक किंवा ब्राऊन शेड वापरूनच करा. अन्य शेडचा वापर टाळा ८. तुमची ऑफिसमधली हेअरस्टाईल कशी असते, या गोष्टीला देखील खूप महत्त्व आहे. केस मोकळे सोडणार असाल, तर ते वारंवर पुढे येऊन कामात अडथळा आणणारे नको. अन्यथा सरळ एक उंच पोनी घालणे कधीही चांगले. ९. चपलांची निवडही अतिशय परफेक्ट असायला हवी. ऑफिसच्या चपला ब्लॅक, ब्राऊन, नेव्ही ब्यू यापैकी निवडा. वेगवेगळ्या रंगाच्या आणि चालताना खूपच आवाज करणाऱ्या चपला ऑफिसमध्ये घालणे टाळावे. १०. जीन्स आणि स्टोल यांच्या मदतीनेही तुम्ही अशा प्रकारचा परफेक्ट फॉर्मल लूक करू शकता. ११. अशा पद्धतीची फॉर्मल ड्रेसिंग तर नेहमीच तुम्हाला एक प्रोफेशनल टच देते. शिवाय बघणाऱ्यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच छाप पडते. टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्सBeauty TipsMakeup Tips