जाई- जुईचे गजरे नेहमीचेच..! आता गुलाब पाकळ्यांचा सुंदर- भरीव गजरा करा- बघा एकदम सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 01:30 PM2024-08-07T13:30:46+5:302024-08-07T13:35:48+5:30

श्रावण महिना सुरू झाला की सणवार, व्रत-वैकल्यांना सुरुवात होते. अशावेळी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिला अगदी हौशीने नटतात. पारंपरिक वेशभुषा करून केसांमध्ये गजराही माळतात.

आता गजरा म्हटलं की जाई- जुई, मोगरा, कुंदा असे गजरे आपण पाहातो. फार फार तर त्याहून वेगळा म्हणजे अबोलीचा गजरा दिसतो.

पण आता असे तेच ते टिपिकल गजरे लावण्यापेक्षा एकदम वेगळा- हटके आणि सगळ्यांमध्ये उठून दिसणारा गुलाब पाकळ्यांचा गजरा लावा (how to make rose petal garland?). हा गजरा अतिशय भरीव दिसतो आणि खूप आकर्षक वाटतो. (easy and simple method of making rose petal gajra)

सध्या बाजारात गुलाब भरपूर प्रमाणात आलेले आहेत. पावसाळा आहे तोपर्यंत ते स्वस्तही मिळतात. त्यामुळे गुलाब पाकळ्यांचा आकर्षक गजरा कसा करायचा, याची ही सोपी पद्धत पाहून घ्या आणि सणावाराच्या दिवशी हा खास गजरा केसांमध्ये माळा...(how to make gulab ka gajra?)

गुलाब पाकळ्यांचा गजरा करण्यासाठी आपल्याला गुलाबाच्या थोड्या मोठ्या आकाराच्या म्हणजेच पुर्ण वाढ झालेल्या पाकळ्या घ्यायच्या आहेत.

एक पाकळी उभी धरा आणि ती दोन्ही बाजुने दुमडा. आता ही दुमडलेली पाकळी सुईमध्ये ओवून घ्या. अशा पद्धतीने एकानंतर एक पाकळी गुंफून घ्या. पाकळ्या थोड्या नाजूक असल्याने हे काम अतिशय हळूवारपणे करावे लागेल.. पण त्यानंतर तयार होणारा गजरा मात्र नक्कीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा असेल.