मेकअप करुनही चेहरा खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो? ५ गोष्टी करा, मेकअप करुनही मिळेल नॅचरल लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 04:48 PM2024-10-31T16:48:01+5:302024-10-31T17:49:07+5:30

मेकअप केल्यानंतर चेहरा भुरकट किंवा पांढरट दिसतो, अशी अनेकींची तक्रार असते. मेकअपचं असं झालं तर मग ऐनवेळी मोठीच फजिती होते आणि मग सुंदर दिसणं तर सोडाच पण आपण थोडं तरी बरं दिसतोय का याच विचारात आपला अख्खा दिवस चालला जातो.. (how to prepare skin for makeup?)

तुमचंही असंच होत असेल तर मेकअप करण्यापुर्वी नेमकं काय केलं पाहिजे आणि मेकअप करताना काय टाळलं पाहिजे हे एकदा पाहा..(tips for long lasting makeup)

मेकअप करण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर एका कपड्यात बर्फ गुंडाळा आणि तो चेहऱ्यावर चोळा. यामुळे त्वचेखाली रक्ताभिसरण चांगले होऊन चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यास सुरुवात होते.

चेहरा धुतल्यानंतर त्यावर टोनर किंवा गुलाबपाणी लावा आणि मग तुमचं नेहमीचं मॉईश्चरायझर घेऊन चेहरा व्यवस्थित मॉईश्चराईज करा. मॉईश्चरायझर लावल्यानंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. ते त्वचेवर व्यवस्थि सेट होऊ द्या आणि मगच पुढचा मेकअप करायला घ्या.

मेकअप करताना तुम्ही कोणत्या टोनचं फाउंडेशन वापरता आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फाउंडेशन निवडताना ते खूप काळजीपुर्वक निवडा.

चेहऱ्याचा मेकअप जेव्हा पुर्णपणे होईल तेव्हा त्यावर मेकअप फिक्सर आवर्जून लावा. कारण त्यामुळे तुमचा चेहरा जशास तसा राहण्यास मदत होईल. शिवाय मेकअप फिक्सर चेहऱ्यावर शिंपडल्यानंतर पफने चेहरा अलगद टिपून घ्या. यामुळे चेहऱ्यावरचा मेकअपचा अतिरिक्त थर निघून जाईल आणि मेकअप छान सेट होईल.