दिवाळीत सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या माळांचा गुंता होऊ नये म्हणून ८ टिप्स, सजावट होईल छान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 08:00 PM2024-10-29T20:00:27+5:302024-10-29T20:18:20+5:30

How To Prevent Diwali Lights From Getting Tangled : Diwali Light Hacks : How to Stop Fairy Lights from Tangling : 8 Simple Tricks To Keep Your Lights Untangled : लाईटच्या माळा एकमेकांत गुंतल्याने सजावट खराब होऊ नये म्हणून या खास टिप्स...

दिवाळी हा सण रोषणाईचा. दिवाळीत आपण दिवे, पणत्या, लाईट्सच्या माळा लावून घराची सजावट करतो. परंतु लाईटसच्या माळा आपण शक्यतो घरच्या भिंती, दरवाजे, खिडक्यांवर लावतो. या लाईटिंगच्या माळांचे डिजाईन करताना बहुतेकवेळा आपण या माळा अशाच भिंतीवर सोडतो. या मोकळ्या सोडलेल्या लाईटिंगच्या माळांचा काहीवेळा गुंता होऊन आपली सजावट बिघडते. असे होऊ नये यासाठी लाईटिंगच्या सोडलेल्या माळांचा गुंता होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील ते पाहूयात( 8 Simple Tricks To Keep Your Lights Untangled).

१. लाईटिंगच्या माळांची सजावट करण्यापूर्वी सर्वात आधी या वर्षभर गोल गुंडाळून कपाटात ठेवलेल्या माळा उघडून त्यांचा गुंता सोडवून घ्यावा. जर आपण गुंता न सोडवताच अशाच माळा उघडून त्यांची सजावट केली तर त्यांना पीळ बसलेला असल्याने अशा माळांची सजावट व्यवस्थित होणार नाही.

२. आजकाल बाजारात विविध प्रकारच्या टांगल फ्री लाईटसच्या माळा अगदी सहज विकत मिळतात. या लाइट्समधील वायर्स एका खास पद्धतीने डिझाइन केलेल्या असतात, जेणेकरून या लाईटसच्या माळा सहजपणे एकमेकांत अडकणार नाहीत. अशा लाइट्सच्या मदतीने तुम्ही तुमचे घर सहज सजवू शकता.

३. लाईटसच्या माळा जर खिडकी किंवा घराच्या भिंतींच्या बाहेरच्या बाजूने सोडल्या असतील तर येणाऱ्या वाऱ्यामुळे त्या एकमेकांत अडकून त्यांचा गुंता होण्याची शक्यता असते. अशावेळी या माळा बांधण्यासाठी टाय रॅपचा वापर करावा. टाय रॅपने या माळा अलगद बांधून घ्याव्यात.

४. लाईटिंगच्या माळांची सजावट बिघडू नये यासाठी आपण सेलोटेपचा देखील वापर करु शकता. सेलोटेप वापरुन आपण या माळा भिंतींवर चिटकवून सजावट करु शकता. यामुळे माळा एकमेकांत अडकून गुंता होणार नाही.

५. लाईट्सच्या माळा घराच्या भिंती किंवा खिडक्यांवरुन सोडताना त्या एकमेकांवर एक येणार नाहीत याची काळजी घ्या, यामुळे लाईटिंगच्या माळा एकमेकांत अडकून गुंता होणार नाही.

६. भिंती किंवा इतर पृष्ठभागावर लाईटिंगच्या माळा चिकटवण्यासाठी छोट्या - छोट्या क्लिपसचा वापर करा.

७. लाईटिंगच्या माळांची सजावट करण्यापूर्वी सगळ्या वायर तपासून पहा. एखादी जरी वायर तुटली असेल तर त्यात इतर वायर्स अडकून गुंता होऊ शकतो.

८. आपण लाईट्सच्या माळा भिंतीवर फिक्स करण्यासाठी केबल क्लीप्सचा वापर करु शकतो. या केबल क्लिप्सना छोटासा खिळा देखील असतो जेणेकरून तो भिंतीवर ठोकून भिंतीला लाईटसच्या माळांनी सजवणे सोपे जाते.