How to Prevent Dryness in Winter : त्वचा खूप कोरडी, काळपट वाटतेय? ४ टिप्स, हिवाळयातही चेहरा दिसेल टवटवीत, फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 01:34 PM2022-10-27T13:34:55+5:302022-10-27T13:44:56+5:30

How to Prevent Dryness in Winter : थंडीत अंघोळीसाठी जर तुम्ही जास्त गरम पाणी वापरत असाल तर त्याचा इफेक्ट त्वचेवर दिसेल. त्वचेवरच मॉईश्चर कमी होऊ द्यायचं नसले तर अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा.

दिवाळीनंतर तुमच्या त्वचेला कोरडे होण्यापासून तुम्ही कसे वाचवू शकता हे जाणून घेणे आता खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात येणारा कोरडेपणा पूर्णपणे टाळता येत नसला तरी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तो नक्कीच कमी होऊ शकतो. (Winter Skin Care Tips) छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही तुमची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवू शकता. कारण त्वचेच्या कोरडेपणाकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर त्वचेवर सुरकुत्या जाणवू लागतात. यामुळे कमी वयातच तुम्ही वयस्कर दिसू शकता. (How to Prevent Dryness in Winter)

थंडीत अंघोळीसाठी जर तुम्ही जास्त गरम पाणी वापरत असाल तर त्याचा इफेक्ट त्वचेवर दिसेल. त्वचेवरच मॉईश्चर कमी होऊ द्यायचं नसले तर अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा.

थंडीत साबण वापरणे टाळा. पण तरीही साबण वापरत असाल तर सौम्य साबण वापरा. सौम्य साबण लावल्याने शरीरातील नैसर्गिक तेल निघत नाही. विशेषतः जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे लक्षात ठेवा.

आंघोळीच्या पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब घाला आणि त्याच पाण्याने आंघोळ करा. ग्लिसरीन तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यास मदत करेल.

ग्लिसरीन आणि शीया बटर असलेले मॉइश्चरायझर्स त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी उत्तम आहेत. आंघोळीनंतर लगेच शरीराला मॉइश्चरायझ करा कारण ते यावेळी शरीरात चांगले शोषले जाते. आठवड्यातून एकदा तुमची त्वचा एक्सफोलिएट करा. असे केल्याने मॉइश्चरायझर शरीरात पोहोचते आणि त्वचेचे पोषण होते.