how to reduce period cramps, 6 yogasana for reducing period cramps, how to get rid of period cramps
मासिक पाळीत पोट खूप दुखतं? ६ योगासनं करा, काही मिनिटांतच आराम मिळेल- कंबरदुखीही थांबेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 02:53 PM2024-08-22T14:53:10+5:302024-08-22T15:00:44+5:30Join usJoin usNext मासिक पाळीच्या दिवसांत खूप जणींचं पोट दुखतं. शिवाय पाठ, कंबरही गळून जातात. अशावेळी चटकन आराम मिळावा यासाठी काही व्यायाम करा, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी देत आहेत. (how to reduce period cramps?) त्यांनी जी काही योगासनं सांगितली आहेत, ती केल्यानंतर पोटदुखी तर कमी होईलच, पण पाठ- कंबर दुखणंही बऱ्यापैकी थांबेल असं त्या सांगत आहेत. (6 yogasana for reducing period cramps) त्यांनी सांगितलेलं पहिलं आसन आहे बटरफ्लाय पोज. सुरुवातीला १५ सेकंदासाठी करा. हळूहळू वेळ वाढवत नेऊन ३ मिनिटांसाठी करा. (how to get rid of period cramps?) दुसरं आहे अर्ध्य मत्स्येंद्रासन. हे देखील सुरुवातीला १५ सेकंदासाठी करावं आणि नंतर वेळ वाढवत न्यावा. तिसरं आसन आहे मालासन. याने पोटाच्या खालच्या भागातले स्नायू माेकळे होतात. त्यामुळे वेदना कमी होतात. चौथं आसन आहे उष्ट्रासन. ही आसनस्थिती सुरुवातीला काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत न्या. यानंतर काही मिनिटे बालासन करून आराम करा. त्यानंतर काही मिनिटांसाठी अशा पद्धतीची हॅप्पी बेबी पोझ करा.. त्यानंतर पुन्हा शवासन करून काही मिनिटे आराम करा. तुम्ही हे व्यायाम पाळीचे तिन्ही दिवस केले तरी चालेल, असं अंशुका परवानी सांगतात. टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेव्यायाममासिक पाळी आणि आरोग्यFitness TipsYogaExerciseMenstrual Health