जुन्या लेदर बुटांना चिरा पडल्या? पाहा उपाय, ५ मिनिटांत बूट दिसू लागतील नव्यासारखे चकचकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 18:39 IST2025-04-16T14:45:37+5:302025-04-16T18:39:21+5:30

काही वर्षे सलग वापर केल्यास लेदर बुटांवर सुरकुत्या येतात आणि ते जुनाट दिसू लागतात.

पण घरच्याघरी एक अगदी सोपा उपाय करून तुम्ही बुटांवरच्या सुरकुत्या काढून टाकू शकता.

त्यासाठी तर सगळ्यात आधी एखाद्या कोरड्या सुती कपड्याने बूट पुसून त्यावरची धूळ स्वच्छ करून घ्या.

यानंतर बोटावर थोडंसं व्हॅसलिन घ्या आणि ते बुटावर सगळीकडून व्यवस्थित लावा. ५ मिनिटांसाठी बूट तसेच राहू द्या.

त्यानंतर बुटांवर बटर पेपर टाका आणि बुटांवरून गरम इस्त्री फिरवा.

बूट अगदी नव्यासारखे कडक आणि चकाचक झालेले दिसतील.

हा उपाय तुम्ही लेदरच्या सगळ्या वस्तूंवरच्या सुरकुत्या घालविण्यासाठी करू शकता.