how to remove yellow stains from switch board, best home remedies for cleaning blackish switch board
थेंबभर खोबरेल तेलाचा सोपा उपाय- कळकट झालेले स्विच बोर्ड होतील चकाचक, नव्यासारखे स्वच्छ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2024 09:12 AM2024-09-07T09:12:43+5:302024-09-07T09:15:01+5:30Join usJoin usNext गौरी- गणपतीच्या स्वागतासाठी आपण सगळ्या घराची स्वच्छता करतो. पण नेमकं घरातले काळपट झालेले स्विच बोर्ड स्वच्छ करणं राहून जातं. (best home remedies for cleaning blackish switch board) स्विच बोर्डला वेळोवेळी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्यांच्यावर एकदा काळपट- पिवळट थर चढला की मग ते स्वच्छ करणे कठीण जाते. (how to remove yellow stains from switch board?) स्विच बोर्ड स्वच्छ करण्याचं काम अनेकांना अवघड वाटतं. पण तेच काम अगदी झटपट, सोप्या पद्धतीने कसं करायचं याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ prajakta_salve_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त काही थेंब खोबरेल तेल आणि टिश्यू पेपर लागणार आहे / , सगळ्यात आधी तर तुमच्या स्विच बोर्डवर थोडसं खोबरेल तेल टाका आणि त्यानंतर ते टिश्यू पेपरने पुसून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्याच्यावर चिटकलेली घाण, धूळ सगळं निघून जाईल आणि त्यांना चमक येईल. टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीCleaning tipsHome remedy