पंचपाळ्यातले हळदी- कुंकू ओलसर होऊन हळदीत किडे होतात? १ उपाय- त्यांचा रंगही राहील फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 09:09 AM2024-09-25T09:09:50+5:302024-09-25T09:10:02+5:30

बऱ्याचदा असं होतं की पंचपाळ्यामध्ये ठेवलेलं हळदी- कुंकू ओलसर होतं. पावसाळ्यात तर ती अडचण बऱ्याचदा येते.

त्यामुळे मग हळदी- कुंकवाचा रंगही काही दिवसांत जरा फिका पडल्यासारखा वाटतो. हळद पांढरट रंगाची दिसू लागते.

शिवाय बऱ्याचदा तर असंही लक्षात येतं की हळदीमध्ये बारीक काळ्या रंगाचे किडे झाले आहेत. असं झालं तर मग ते हळद- कुंकू आपण टाकून देतो. पण असं करण्यापेक्षा हा एक सोपा उपाय करून पाहा.

पंचपाळ्यातले किंवा इतर बरणीमध्ये भरून ठेवलेले हळद- कुंकू अधिक दिवस फ्रेश ठेवायचे असेल, त्यात ओलसरपणा येऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी आपण कापूरचा वापर करू शकतो.

यासाठी कापूराची थोडीशी पावडर करून ती पंचपाळ्यात किंवा हळदी- कुंकू भरून ठेवलेल्या इतर बरणीच्या तळाशी टाकून ठेवा. यामुळे हळदी- कुंकवामध्ये ओलसरपणाही येणार नाही आणि त्यांचा रंग उडून ते फिकेही पडणार नाहीत.