How to stay fit without exercise? 5 Tips for fitness
व्यायाम करायला वेळ नाही? तातडीने आहार बदला, ५ टिप्स- व्यायाम न करताही राहाल फिट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 08:10 AM2022-09-20T08:10:10+5:302022-09-20T08:15:01+5:30Join usJoin usNext १. फिट तर सगळ्यांनाच रहायचं असतं. पण फिटनेस राहण्यासाठी गरजेचा असणारा व्यायाम करण्याची अनेकांची तयारी नसते. व्यायाम करणं अनेकांसाठी जाम कंटाळवाणं असतं. त्यामुळे ते व्यायाम टाळण्यासाठी कायम बहाणा देत असतात. २. दुसरे लोक असेही असतात की ज्यांना व्यायामासाठी थोडासा वेळ काढणंही खरोखरंच अवघड असतं. पण फिटनेस टिकविण्यासाठी व्यायामाशिवाय दुसरं जे काही शक्य होईल, ते करण्याची जाम इच्छा असते. ३. अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी या काही टिप्स अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. व्यायाम न करताही फिट कसं रहायचं, याचे उपाय इन्स्टाग्रामच्या gunjanshoutsandimwow.in या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. ४. यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे आहारात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात ठेवा. प्रोटीन्स योग्य प्रमाणात असले तर स्नायू मजबूत होण्यास फायदा होतो. ५. प्रोटीन्सबरोबर फायबरही योग्य प्रमाणात असावेत. आहारात फायबर योग्य प्रमाणात असले तर कॅलरीचा इनटेक आपोआपच मर्यादित होऊन जातो. ६. कोणत्याही गोष्टीचा ताण येणार नाही, याचा प्रयत्न करा. तसेच रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. यामुळे शरीरातील हंगर हार्मोन्स संतुलित राहतात आणि यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. ७. दिवसभरातून पुरेसं पाणी प्या. पाणी योग्य प्रमाणात जर पोटात गेलं तर शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. चयापचय आणि पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे अनेक समस्या सुटतात. ८. सतत ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. व्यायाम शक्य होत नसेल तर चालणे, घरातली कामे करणे किंवा इतर अशी कामे करा जेणेकरून पुरेशी शारिरीक हालचाल होईल. टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्सFitness TipsExerciseHealth Tips