How to take care of plants before starting summer, gardening tips for summer
उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 05:02 PM2024-02-13T17:02:05+5:302024-02-13T17:06:48+5:30Join usJoin usNext हिवाळा संपून आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. कारण सकाळी आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा असला तरी आता दिवसा मात्र ऊन तापायला लागलं आहे. पंखाही लावाला लागतो आहे. उन्हाळ्याच्या अनुशंगाने आपण आपल्या रुटीनमध्ये जसा हळूहळू बदल करतो आहोत, तसाच बदल बागेतील रोपांच्या बाबतीतही करायला पाहिजे. जेणेकरून भर उन्हाळ्यातही तुमची बाग बहरून जाईल. बागेतील रोपांच्या बाबतीत करायला हवा तो सगळ्यात मुख्य बदल म्हणजे आता हळूहळू झाडांना पाणी घालण्याचं प्रमाण वाढवा. आतापर्यंत एक दिवसा आड पाणी दिलं तरी चालत होतं. आता मात्र रोपांच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण वाढवा. मोगरा, मधुमालती, मधुकामिनी या झाडांना बहर येण्याचा मौसम म्हणजे उन्हाळा. त्यामुळे या झाडांना आताच चांगले खत देऊन टाका. म्हणजे एखाद्या महिन्याने ती झाडं चांगली बहरून जातील आणि उन्हाळ्यात छान फुलतील. सकलंट्स प्रकारच्या रोपट्यांना उन्हाळा सोसवत नाही. त्यामुळे आता त्यांची जागा थोडी बदला. जिथे त्यांना कमी ऊन लागेल अशा ठिकाणी त्यांना ठेवा. तुम्हाला जर कोणत्या रोपांची खरेदी करायची असेल तर ती आताच करून टाका. कारण आणखी ऊन वाढल्यावर जर एखादे रोप नर्सरीतून आणले आणि ते कुंडीत लावले, तर उन्हामुळे ते रोप वाढायला त्रास होतो, त्याची वाढ मंदावते. टॅग्स :बागकाम टिप्सगच्चीतली बागइनडोअर प्लाण्ट्सपाणीसमर स्पेशलGardening TipsTerrace GardenPlantsWaterSummer Special