If Your Child Is Weak In Studies Then Follow These Words Of Educator Vikas Divyakirti
मुलांना अभ्यासाची गोडीच लागलेली नाही? विकास दिव्यकिर्तींचा खास सल्ला- मुलं स्वत:हून करतील छान अभ्यास By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:24 PM2024-07-29T15:24:37+5:302024-07-29T16:44:21+5:30Join usJoin usNext Parenting Tips By Educator f Vikas Divyakirti : मुलांची अभ्यासात टाळाटाळ केली किंवा त्यांना अभ्यासाला बसणं कंटाळवाणं वाटू लागलं तर पालकांना फार टेंशन येतं. वर्गातील इतर मुलांच्या तुलनेत आपलं मूल मागे पडायला नको असं प्रत्येक पालकाला वाटतं. आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा चांगलं शिकावं यासाठी पालक त्यांना सगळ्यात सोयी सुविधा पुरवतात. त्यांना कधीच कमी पडत नाहीत. सर्व सुख सुविधा असतानाही मुलं नीट अभ्यास करत नाही आणि मागे पडतात. इतर विद्यार्थांच्या तुलनेत त्यांना नेहमीच कमी गुण मिळतात. जर तुमचे मूल इतर विद्यार्थांपेक्षा मागे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर प्रसिद्ध शिक्षक आणि आयएएस कोचिंग क्लासेसचे संस्थापक डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी मुलांशी कसं वागायचं याबाबत सांगितले आहे. डॉ. विकास सांगतात की तुमचे मूल अभ्यासात मागे असेल तर इतर मुलांमध्ये येऊन त्यांच्यावर दबाव पाडू नका. जर कोणी आपल्या मुलाचे ९८ टक्के आनंदाने सांगत असेल तर तुम्ही आपल्या मुलाचे ५८ टक्केसुद्धा त्याच गर्वाने सांगा. मुलांवर दबाव टाकल्याने आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांच्यात काही करून दाखवण्याची क्षमता कमी होते. मुलांना कशासाठीही बळजबरी करून उपयोग नाही. ते वेळेसोबत बदलत जातील आणि स्वत:ला सिद्ध करतील आणि आयुष्यात काही ना काही करतील अरे विकास दिव्यकिर्ती पालकांना सांगतात.टॅग्स :पालकत्वलहान मुलंParenting Tipskids