जिम किंवा एक्सरसाईज नाही, फक्त ३० मिनिटं चाला; 'या' धोकादायक आजारांपासून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:24 IST2025-01-15T12:14:12+5:302025-01-15T12:24:52+5:30
आपलं आरोग्य सुधारण्यासाठी चालणं हा एक उत्तम मार्ग आहे.

चालणं हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसातून फक्त ३० मिनिटं चालण्याने तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. आपलं आरोग्य सुधारण्यासाठी चालणं हा एक उत्तम मार्ग आहे.
चालण्यामुळे हृदयरोग, टाइप २ मधुमेह, ऑस्टियोपोरोसिस इत्यादी अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त चालण्यामुळे स्नायू मजबूत होतात. चालण्याचे आणखी फायदे जाणून घेऊया...
हृदयाचं आरोग्य
दररोज चालण्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. ब्लड फ्लो चांगला होतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत होते. चालण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
मधुमेह
चालण्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते. हे शरीराची इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी वाढवते, ज्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.
वजन कमी करणं
चालणं हा एक उत्तम कार्डिओ व्यायाम आहे, जो कॅलरीज बर्न करण्यास मदत करतो. नियमित चालण्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
मानसिक आरोग्य
चालण्यामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होतं. हे मेंदूमध्ये एंडोर्फिन सोडतं, ज्यामुळे मानसिक स्थिती सुधारते आणि आनंदाची भावना निर्माण होते.
हाडे आणि सांधे मजबूत करणे
चालण्यामुळे हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. हे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करतं.
पचनसंस्था सुधारते
नियमित चालण्यामुळे पचनसंस्था चांगली कार्य करण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
रक्ताभिसरण सुधारतं
चालण्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात.
चालताना या गोष्टी ठेवा लक्षात
चालताना आरामदायी शूज घालणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला तुमच्या पायांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
जर तुम्ही आधी चालत नसाल, तर हळूहळू सुरुवात करा आणि कालांतराने तुमचा वेग आणि चालण्याचा वेळ वाढवा. तसेच, चालताना हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून पाणी पित राहा.