मुलं खूप उद्धटासारखी वागतात? लहानपणीच ७ सवयी लावा- मुलं होतील गुणी-हुशार आणि नम्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:10 PM2024-05-25T13:10:26+5:302024-05-25T17:22:55+5:30

Parenting Tips in Marathi : मुलांना संयम शिकवायला हवा.

प्रत्येक आई वडीलांचे स्वप्न असते की त्यांच्या मुलांने एक उत्तम व्यक्ती बनावं. आपल्या मुलांचे कौतुक व्हावं त्यांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये अशी प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते. (Parenting Tips)

परवानगीशिवाय एखाद्याच्या वस्तूला स्पर्श करणे किंवा वापरणे चुकीचे आहे. हा धडा त्यांना लहानपणीच शिकवा. अशा प्रकारे ते लोकांच्या सीमांचा आदर करण्यास शिकतील आणि परवानगीशिवाय इतरांच्या वैयक्तिक जीवनात प्रवेश करणार नाहीत.

जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वापरता तेव्हा ती परत योग्य ठिकाणी ठेवा. जर ते खेळण्यांशी खेळत असतील तर, अभ्यासासाठी पुस्तके किंवा खाण्यासाठी प्लेट्स काढल्या असतील. प्रत्येक गोष्ट वापरल्यानंतर योग्य ठिकाणी ठेवायला लहानपणापासून शिकवा आणि सवय लावा.

मुलांसाठी काळजी घेणे आणि शेअर करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांना शिकवा. यासाठी त्यांना खाद्यपदार्थ, खेळणी इत्यादी त्यांच्या मित्र आणि भावंडांसोबत शेअर करायला शिकवा. अशा प्रकारे त्यांच्यात काळजीची भावना विकसित होईल.

मुलांमध्ये संयम विकसित करण्याचा हा देखील एक मार्ग आहे. यासाठी त्यांना खरेदी करताना रांगेत उभे राहावे लागेल, जेवणासाठी थांबावे लागेल याची सवय लावा.

कोणाशीही बोलायचे असेल तर आदराने बोलणे गरजेचे आहे. लहानपणापासूनच मुलांना हे शिकवा. अशा प्रकारे ते लोकांशी सभ्य भाषा वापरण्यास शिकतील. यासाठी घरातील वडीलधाऱ्यांनीही मुलांशी चांगल्या भाषेत आणि वागण्याने बोलणे गरजेचे आहे.