Is Burger Healthier Than Samosa : ....म्हणून बर्गरपेक्षा समोसा खाणं केव्हाही तब्येतीसाठी चांगलं; हे आहेत समोसा खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:27 PM2022-06-07T17:27:40+5:302022-06-07T18:06:00+5:30

Is Burger Healthier Than Samosa : समोसा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, परंतु तो पूर्णपणे मैदा, जिरे, उकडलेले बटाटे, वाटाणे, मीठ, मिरची, मसाले, वनस्पती तेल किंवा तूप यांसारख्या रसायनमुक्त घटकांपासून बनवलेले असतो.

समोसा आणि बर्गर दोन्ही तुमच्या समोर ठेवले तर तुम्ही काय उचलाल? आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल. त्याच वेळी, हेल्थ कॉन्शियल लोक समोसा आणि बर्गर दोन्ही खाणं टाळतील, कारण दोन्ही जंक फूड आहेत. असं त्यांना वाटतं. समोसे आणि बर्गर दोन्ही तब्येतीसाठी अयोग्य असल्याचा समज आहे. (Samosa vs burger which junk food is healthier here is truth)

बर्गर बनवताना त्यात मैदा, साखर,ग्लूटेन, वनस्पती तेल, यीस्ट, मीठ, सोया पीठ, तीळ, भाज्या, मेयोनेझ, भरपूर प्रिझर्वेटिव्ह, अॅसिडिटी रेग्युलेटर, करेक्टर्स, चीज किंवा बटाटा पॅटीज वापरले जातात.

समोसा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, परंतु तो पूर्णपणे मैदा, जिरे, उकडलेले बटाटे, वाटाणे, मीठ, मिरची, मसाले, वनस्पती तेल किंवा तूप यांसारख्या रसायनमुक्त घटकांपासून बनवलेले असतो.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) नावाच्या संशोधन केंद्राने नुकतेच समोसे आणि बर्गरवर एक संशोधन केले आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की समोसे खाणे बर्गरपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालानुसार, समोसा बर्गरपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे. कारण समोसा हा ताज्या पदार्थापासून बनवला जातो. पिठापासून ते बटाट्यापर्यंत सर्व काही ताजे वापरले जाते आणि हा स्वादिष्ट-मसालेदार समोसा तुमच्या ताटात पोहोचण्यापूर्वी गरम तेलातून तळला जातो.

दुसरीकडे, बर्गर बनवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्ज, अॅसिडिटी रेग्युलेटर, फ्रोझन पॅटीज यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. अहवालानुसार, ताजे तयार केलेल्या अन्नामध्ये कोणतेही रसायन नसतात, जे प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये राहतात.

CSE च्या अहवालानुसार भारतातील एकूण मृत्यूंपैकी ६१ टक्के मृत्यू हे केवळ जीवनशैली आणि असंसर्गजन्य आजारांमुळे होत असल्याचेही यात समोर आले आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये भरपूर रसायने आढळतात, तर ताज्या अन्नामध्ये तुम्हाला अजिबात रसायन सापडणार नाही. अनावश्यक जंक फूड खाल्ल्याने तुमच्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात.

समोश्याव्यतिरिक्त भारतात पोहे, जे स्नॅक म्हणून खाल्ले जातात. ते देखील संशोधन केंद्राने सुरक्षित असल्याचे प्रमाणित केले आहे. केंद्रानुसार पोहे बनवण्यासाठी नैसर्गिक आणि ताज्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे नूडल्सपेक्षा पोह्यांचे सेवन शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.