हिवाळ्यात काकडी खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? काकडी खाल्ल्याने खरंच सर्दी होते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 03:10 PM2023-01-23T15:10:03+5:302023-01-23T15:18:17+5:30

Is eating cucumber in winter good or bad for health? हिवाळ्यात काकडी खावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, त्याचं हे उत्तर

हिवाळ्यात काकडी खाण्यास लोकं टाळाटाळ करतात. मात्र, काकडीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढ​​ण्यास काकडी मदत करते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते. जे आपल्या शरीरासाठी अनेक प्रकार फायदेशीर ठरते. हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत.

थंडीच्या दिवसात काकडी खाणे लोकं टाळतात. कारण काकडी थंड असते. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो.

काकडी फक्त उन्हाळ्यातच नाही तर, हिवाळ्यात देखील खाण्याचे फायदे आहेत. यातील अनेक पौष्टीक तत्वे शरीराला उपयुक्त ठरतात.

थंडीत आपण कमी प्रमाणावर पाणी पितो. अशावेळी काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता काकडीद्वारे भरून निघते, यासह शरीर हायड्रेट राहते.

काकडी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच काकडीमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलेरीज आणि जास्त प्रमाणात मिनरल्स असतात. त्यासाठी काकडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

काही लोकांची हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते, खोकला, फ्लू सर्दी होण्याची अधिक शक्यता असते. त्यांनी काकडी खाणे टाळावे.

सर्दी-खोकला झाल्यास शरीराला आतून उबदार ठेवण्याची गरज असते, परंतु काकडीचे थंड गुणधर्म शरीराला थंड ठेवतात, त्यामुळे सर्दी खोकला झाल्यास काकडी खाऊ नये.

काकडीत पाण्याचे प्रमाण ९६ टक्के असते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते, अशावेळी काकडी दिवसा खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते.