'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 12:44 PM 2024-03-18T12:44:42+5:30 2024-03-18T12:54:21+5:30
Jyotika Unbelievable Fitness at the Age of 45 : एका मुलीची आई असून, ज्योतिका इतकी फिट आणि दिसायला यंग कशी? 'मेरी जंग', 'चंद्रमुखी', डोली सजा के रखना' यासह अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू चालवणारी ज्योतिका (Jyotika) अनेकांना आवडते. तिने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ४५ वयात पदार्पण करूनही ती तितकीच फिट आणि ब्यूटीफुल दिसते. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'शैतान' (Shaitaan), व त्यात तिने साकारलेलं पात्र ऑडियन्सला भावत आहे. शिवाय तिने केलेल्या अभिनयाचं आणि फिटनेसचं (Fitness Secret) कौतुक करण्यात येत आहे(Jyotika Unbelievable Fitness at the Age of 45).
एका मुलीची आई असून, ज्योतिका इतकी फिट कशी? ती फिटनेससाठी नक्की काय करते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. ज्योतिका फिट आणि यंग दिसण्यासाठी कोणता डाएट फॉलो करते. व्यायाम कोणता करते? पाहूयात.
साउथ इंडस्ट्रीमधील फिट अॅक्ट्रेस म्हणून ज्योतिकाची ओळख आहे. सकाळी जॉगिंगपासून ते जिममध्ये घाम गाळण्यापर्यंत ज्योतिका आपल्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करते. यामुळे ती कायम फिट आणि त्वचा तजेलदार दिसते.
अभिनेत्री आपल्या फिटनेस रुटीनमधून ब्रेक घेत नाही. ज्योतीकाच्या म्हणण्यानुसार ब्रेक घेतल्याने सातत्य राखण्यात अडचण निर्माण होते. त्यामुळे फिटनेस रुटीन बिघडते. ज्यामुळे वजन वाढते, शिवाय इतरही कामात आळस येतो. त्यामुळे फिटनेसमध्ये ब्रेक घेणं उचित नसल्याचं अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
ज्योतिका मुख्यतः बॉडीवेट करताना दिसून येते. यामध्ये पुश-अप्स, स्क्वॅट्स, लंजेस, प्लँक यासह इतर बॉडीवेट एक्सरसाईजचा समावेश आहे. ती आपल्या वर्कआउट रुटीनचे अपडेट व्हिडिओद्वारे सोशल मिडीयावर शेअर करते. तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती इंटेन्स वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'केवळ वजन कमी करण्यासाठी नसून, आयुष्य वाढवण्यासाठी फिटनेस गरजेचं आहे.'
बॉडीवेट वर्कआउट करण्यासोबत ज्योतिका कार्डिओवर देखील भर देते. सकाळची ताजी हवा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. जॉगिंग केल्यानंतर ती दररोज नारळ पाणी किंवा ग्रीन टी पिते.
जिम ट्रेनिंग घेतल्यानंतर ज्योतिका नियमित स्पा किंवा स्विमिंग करते. यामुळे तिचं शरीर आणि मन शांत राहते. शिवाय जिम ट्रेनिंग घेतल्यानंतर शरीराला आराम मिळतो.
ज्योतिका आपल्या डाएटमध्ये लो कॅलरीजयुक्त पदार्थ खाते. शिवाय पोर्शन कण्ट्रोलवर भर देते. यामुळे वजन कण्ट्रोलमध्ये राहते. ती आपल्या डाएटमध्ये हेल्दी फ्रुट्स, भाज्या आणि साऊथ इंडियन पदार्थांचा समावेश करते.
स्किनवर कायम नैसर्गिक ग्लो टिकून राहावा यासाठी ती पाणी पीत राहते. सतत वेळेच्या अंतरावर पाणी प्यायल्याने स्किन क्लिन, बॉडी टोन्ड, आणि टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात.
ज्योतिकाचा नुकताच विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पुरेपूर प्रतिसाद मिळत आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अजय देवगण आणि आर. माधवन यांनी स्क्रीन शेअर केली आहे. ती लवकरच 'सरफिरा' या चित्रपटाद्वारे अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार असून, तिच्या अपकमिंग चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.