कुकरची शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, ना गॅस खराब होणार ना कुकर- वेळही वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 09:07 AM2023-08-02T09:07:00+5:302023-08-02T09:10:02+5:30

Kitchen hacks : कुकरच्या शिट्टीमध्ये घाण जमा झाली असेल तर शिट्टी लवकर होत नाही. शिट्टीबरोबर पाणीसुद्धा बाहेर पसरू लागतं. म्हणूनच प्रेशर कुकरची शिट्टी नियमित साफ करत राहा

आजकाल प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात कुकरचा वापर केला जातो. डाळ, तांदळापासून भाज्या, पुलाव सर्व काही बनण्यासाठी लोक प्रेशर कुकरचा वापर करतात. यामुळे गॅसची बचत होण्याबरोबच जास्त जेवण कमी वेळात बनवून होतं. ही एक परफेक्ट कुकींग टेक्निक आहे. (Tips To Fix The Pressure Cooker Leaking Steam Issue)

पण कुकरचा वापर करत असताना बरेच प्रोब्लेम्स येतात जसं की शिट्टी वेळेत होत नाही, कधी भात कपरतो तर अन्न जास्त शिजतं. सगळ्यात कॉमन जाणवणारा प्रोब्लेम म्हणजे कुकरच्या शिट्टीतून पाणीबाहेर येतं. यामुळे अनेकदा कुकर खराब होतो आणि वारंवार दुरुस्त केल्यानंतरही नीट न झाल्यानं नवा कुकर घ्यावा लागतो.

१) कुकिंगसाठी प्रेशर कुकरमध्ये जास्त पाणी घातलं असेल तर आचेवर ठेवल्यानंतर प्रेशरमुळे शिट्टीबरोबर पाणी सुद्धा बाहेर येईल म्हणून नेहमी योग्य प्रमाणात पाणी घाला. जास्त पाणी घातल्यानं पाणी बाहेर येतंच

२) तांदूळ शिजवण्यासाठी जेव्हा तुम्ही कुकर ठेवता तेव्हा उच्च आचेवर ठेवू नका. हाय फ्लेममुळे कुकरमधलं पाणी शिट्टीतून बाहेर येतं. यासाठी उच्च आचेवर अन्न शिजवा.

३) कुकरच्या शिट्टीमध्ये घाण जमा झाली असेल तर शिट्टी लवकर होत नाही. शिट्टीबरोबर पाणीसुद्धा बाहेर पसरू लागतं. म्हणूनच प्रेशर कुकरची शिट्टी नियमित साफ करत राहा

४) अनेकदा कुकरच्या झाकणावर असलेलं रबर दुसऱ्या कुकरवर लावलं जातं. अशावेळी कुकरचे झाकण लूज बसतं आणि पाणी बाहेर येतं. म्हणून कुकरच्या रबरची अदलाबदल करू नका.

५) जर कुकर जुना झाला असेल किंवा त्याचे झाकण अनेकदा खाली पडले असेल तर ते खराब होऊ शकते. अशावेळी कस्टमर केअरशी बोलून कुकर दुरूस्त करून घ्या.