ऑस्कर जिंकणाऱ्या गुनीत आणि कार्तिकी, सलाम दोघींना! भारतासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या या दोन धाडसी महिला कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 12:03 PM2023-03-13T12:03:05+5:302023-03-13T12:25:03+5:30

Know Who Is Guneet Monga and Kartiki Gonsalvis Who Won Oscar for India, story of a glory!

बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री फिल्म या कॅटेगरीमध्ये ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ ने ऑस्कर पुरस्कार जिंकला आणि दोन नावं एकदम चर्चेत आली. कोण त्या दोघी ज्यांनी ऑस्कर जिंकत एक नवा इतिहास लिहिला.(Know Who Is Guneet Monga and Kartiki Gonsalvis Who Won Oscar).

गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस. ही त्या दोघींची नावं. भारतीय डॉक्युमेंट्रीला जागतिक स्तरावर एवढा मोठा सन्मान मिळवून देत या दोघींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहेच.

गुनीत मोंगा या भारतीय चित्रपट निर्मात्या असून त्यांनी बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या बऱ्याच चित्रपटांना याआधीही जागतिक पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. ९. “द एलिफंट व्हिस्परर्स” ही लोकांची कथा आहे, जे पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करत आहेत आणि त्यांना जंगलाच्या गरजांची जाणीव आहे, असे गुनित यांनी या डॉक्युमेंट्रीबाबत सांगितले.

गँग्स ऑफ वासेपूर, वन्स अपॉन टाइम इन मुंबई, हरामखोर, द लंच बॉक्स यांसारखे अनेक चित्रपटांच्या निर्मात्या म्हणून गुनीत मोंगा यांची ओळख आहेच. यातील बऱ्याच चित्रपटांचे स्क्रीनिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत झाले आहे. आणि आता त्यांनी प्रोड्युसर म्हणून स्वत:साठी एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.

२०१९ मध्येही गुनीत मोंगा यांना बेस्ट डॉक्युमेंट्री या कॅटेगरीमध्ये ‘पिरीयड एंड ऑफ सेन्टेन्स’ या डॉक्युमेंट्रीसाठी अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्यांदा ऑक्सर पटकावणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत.

‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्सालविस. कला क्षेत्रात नव्याने आलेल्या या भारतीय महिला दिग्दर्शिकेला हा पुरस्कार मिळणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

मनुष्याचे निसर्गाशी असलेले अतूट असे नाते, सजीवांबद्दलची सहानुभूती आणि सहअस्तित्व या गोष्टींमुळे मी आज याठिकाणी उभी आहे अशा भावना कार्तिकी यांनी आपला पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केल्या.

आमच्या चित्रपटाला योग्य न्याय दिल्याबद्दल आणि स्थानिक लोक आणि प्राण्यांचा या माध्यमातून सन्मान केल्याबद्दल ऑस्कर अकादमीचे त्यांनी आभार मानले. याबरोबरच नेटफ्लिक्स, आई-वडील, बहिण आणि भारत देशाचे आभार मानत त्यांनी हा पुरस्कार स्विकारला. दिग्दर्शक म्हणून कार्तिकी यांची ही पहिलीच डॉक्युमेट्री होती.

“द एलिफंट व्हिस्परर्स” ही लोकांची कथा आहे, जे पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करत आहेत आणि त्यांना जंगलाच्या गरजांची जाणीव आहे, असे गुनित यांनी या डॉक्युमेंट्रीबाबत सांगताना स्पष्ट केले.