Diwali : दिवाळीत घराचं सुंदर डेकोरेशन करा, पाहा ८ आयडिया! घर सजेल सुंदर-वाटेल प्रसन्न... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 10:00 AM 2024-10-27T10:00:00+5:30 2024-10-27T14:23:38+5:30
Last Minute Diwali Decoration Ideas : Affordable Diwali Home Decor : Easy Diwali Decor Ideas : दिवाळीत घर सजवण्यासाठी रांगोळी, दिवे, कंदील यासोबतच वापरा या ८ वस्तू, सजावट होईल देखणी... दिवाळी म्हटली की आपण घराची साफसफाई करतो, घरातील जुन्या झालेल्या गोष्टी बदलतो आणि घराची छान सजावट करतो. रांगोळी, दिवे, कंदील, लाईट्स - फुलांच्या माळा अशा अनेक वस्तूंचा वापर आपण सजावटीसाठी करतो. दिवाळीत फराळाला किंवा जेवायला पाहुणे येणार असतील तर घर झटपट सजवण्यासाठी काही सोप्या आयडीया पाहूयात(Last Minute Diwali Decoration Ideas).
१. हँगिंग दिवे :- दिवाळीत घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा घराबाहेर असे काचेचे हँगिंग दिवे आपण लावून सजावट करु शकता. या काचेच्या दिव्यांमध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे बल्ब लाईट्स किंवा छोटे दिवे लावू शकता.
२. कुंदन डिझाईन्स :- बाजारांत आपल्याला अशा प्रकारे कुंदन आणि मोती वर्क केलेले आकर्षक डिज़ाईन्सचे रेडिमेड पॅच मिळतील. हे डिज़ाईन्सचे रेडिमेड पॅच आपण उंबऱ्याच्या बाजूला, रांगोळीच्या भोवती किंवा फराळाच्या डिश भोवती सजावटीसाठी ठेवू शकतो.
३. फुलांचे तबक :- अशाप्रकारची धातूची, काचेची अशी कोणतीही हंडी असेल तर त्यामध्ये फुलं, दिवे आणि शोभेच्या वस्तू घालून ते एखाद्या टेबलवर किंवा दारापाशी ठेवले तर खूप छान दिसते.
४. फ्लोटिंग दिवे :- काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात तेल घालून त्यावर ठेवलेले दिवे घराची शोभा नक्कीच वाढवतात. या काचेच्या ग्लासात आपण वेगवेगळ्या रंगाचे किंवा ग्लिटरचे पाणी देखील घालू शकतो.
५. लायटींग कंदील :- दिवाळीत आपण लाईटिंगच्या माळा वापरुन घराची सजावट तर करतोच. पण आपण असे बॅटरीवर चालणारे छोटे वेगवेगळ्या आकाराचे कंदील विकत घेऊ शकता. हे कंदील आपण खिडक्या, टेबल यावर घेऊ शकता.
६. दिव्यांचे तबक :- फुलांच्या तबकांप्रमाणेच आपण घराच्या एखाद्या कोपऱ्यात असे दिव्यांचे तबक देखील ठेवू शकतो. दिवे आणि फुलांचे तबक कायमच घराला फेस्टिव्ह लूक देतात.
६. डिजाईन्सच्या माळा :- आपण घराच्या भिंतींवर अशाप्रकारे वेगवेगळ्या आकर्षक माळा सोडून घराची सजावट करु शकतो. विविध रंगांची फुले आणि पानांच्या डिझाईन्स असणाऱ्या या माळा अधिकच खुलून दिसतात.
७. सुगंधित दिवे किंवा मेणबत्त्या :- दिवाळीत आपण टेबलवर मेणबत्तीचे आकर्षक स्टॅन्ड ठेवून त्यात वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्त्या लावून सजावट करु शकतो. याचसोबत बाजारांत विकत मिळणारी सुगंधित मेणबत्त्या लावून त्यांच्या मंद सुवासाने वातावरण अधिक प्रसन्न होते.
८. आकर्षक लाईटच्या माळा :- दिवाळीत घराला लायटिंग लावून सजवताना फक्त बल्ब किंवा छोट्या लाईट्सच्या माळा न लावता, आपण अशा प्रकारे लाईट्सच्या बल्ब भोवती वेगवेगळे डिझाईन्स असणाऱ्या लाईटच्या माळा खरेदी करु शकता.