Latest Blouse Designs Ideas : नवीन स्टाईलचं सुंदर, देखणं ब्लाऊज शिवायचंय? ब्लाऊजचं पॅटर्न बिघडू नये म्हणून या घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:02 PM2021-12-01T18:02:26+5:302021-12-01T19:08:14+5:30

Latest Blouse Designs Ideas : खूपदा काय होतं ब्लाऊजं पॅटर्न टेलर व्यवस्थित शिवून देत नाहीत. त्यामुळे आपले पैसेही वाया जातात आणि कापडंही वाया जातं. म्हणून ब्लाऊज शिवायला देण्याआधीच तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात

लग्नसराई सुरू झालीये, कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाताना अनेकजणी साड्या नेसतात. नेहमी नेहमी त्याच पॅटर्नचं ब्लाऊज न शिवता तुम्ही प्रत्येक साडीवर वेगळं पॅटर्न ट्राय करू शकता. जेणेकरून लूक जास्त खुलून दिसेल. (Latest Simple Blouse pattern ideas)

खूपदा काय होतं ब्लाऊजं पॅटर्न टेलर व्यवस्थित शिवून देत नाहीत. त्यामुळे आपले पैसेही वाया जातात आणि कापडंही वाया जातं. म्हणून ब्लाऊज शिवायला देण्याआधीच तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात

तुमचे स्तन जर लहान असतील तर तुम्हाला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिऊन घ्या. यामध्ये तुमची फिगर खूप छान दिसेल. कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजला तुम्ही पॅड्स लावून घेऊ शकता.

जर तुम्हाला लांब बाह्याचं ब्लाऊज शिवायचं असेल तर कोपऱ्याच्या 2 इंच वर अथवा 2 इंच खाली असा ब्लाऊज शिवा. एकदम कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवाल तुमचा लुक फारसा चांगला दिसणार नाही. तसंच हात वरखाली करण्यासाठीही ब्लाऊजचे डिझाईन त्रासदायक ठरू शकते.

तुम्ही कशीही साडी नेसणार असाल तरी ब्लाऊजची पुढची बाजू चांगली असणं महत्वाचं असतं. तुम्ही ब्लाऊजचा गळा मागच्या बाजूने अधिक डीप ठेवणार असाल तर पुढचा गळा लहान ठेवा.

दोन्ही दिशेला डीप नेक अजिबातच चांगला दिसत नाही. अशा ब्लाऊजवर नेहमी फिटिंग ब्रा चा वापर करावा. अन्यथा स्तन ओघळलेले दिसतात.

साडी आणि ब्लाऊजमध्ये योग्य मेळ असणे अत्यंत गरजेचं आहे. तुमची साडी प्लेन असेल तर ब्लाऊजवर वर्क डिजाईन असायला हवी.

याऊलट जर भरजरी साडी असेल तर ब्लाऊज सिंपल ठेवा.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतंही नवीन पॅटर्न शिवताना चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या.

जेणेकरून ब्लाऊजचं कापड आणि पैसे दोन्ही वाया जाणार नाहीत.

तुम्ही बेल बॉटल किंवा फ्रिल्सच्या हातांचं ब्लाऊज शिवू शकता. एखादं घरातलं लग्न कार्य असेल तर तुम्ही आजकाल जड वर्क असलेल्या ब्लाऊजची फॅशन आहे तसे ब्लाऊज शिवू शकता.

(Image Credit- Social Media)