Diwali : मोत्याचा तनमणी ते चिंचपेटी, पाहा पारंपरिक ते आधुनिक सुंदर मोत्याचे दागिने-दिवाळीतला खास साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 02:44 PM2024-10-29T14:44:29+5:302024-10-29T15:48:57+5:30

दिवाळीसाठी मोत्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर हे काही सुंदर लेटेस्ट डिझाईन्स पाहा. नेहमीचे त्याच त्या धाटणीचे टिपिकल दागिने घालण्यापेक्षा कधीतरी असं काही वेगळं ट्राय करून पाहा...

हे असं एक डिझाईन आहे जे तुम्ही साडीवरही घालू शकता आणि इंडोवेस्टर्न कपड्यांवरही घालू शकता. असा एखादा दागिना तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा..

हा एक आणखी सुंदर प्रकार. ट्रॅडिशनल ड्रेसिंगवर किंवा कोणत्याही पार्टीवेअर कपड्यांवर ते खूप छान शोभून दिसेल.

काठपदर साडी असेल आणि तिच्यावर हेवी काहीतरी घालायचं असेल तर अशा पद्धतीचं वेगवेगळे स्टोन जडवलेलं मोत्याचं नेकलेस घाला. चारचौघांत अगदी उठून दिसाल.

हा एक आणखी सुंदर स्टायलिश प्रकार. वेस्टर्न ड्रेसिंगवरही हे खूप छान दिसेल. शिवाय कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर अगदी सहज चालेल.

मोत्याचे हेवी दागिने आवडत असतील आणि पुढे येणारी लग्नसराईसाठी लक्षात घेऊन दागिने घेणार असाल तर अशा पद्धतीचे दागिने घेण्याचा विचार करू शकता.

पांढरे मोती आणि काळे मोती हे कॉम्बिनेशन नेहमीच छान दिसतं. असं काही गळ्यात घातलं की वेगळं मंगळसूत्र घालण्याची गरज नाही.

मोती आणि गोल्डन मणी हे कॉम्बिनेशनही खूप उठून दिसतं. कोणत्याही ट्रॅडिशनल ड्रेसिंगवर आणि विशेषत: साड्यांवर तर ते खूपच उठून दिसतं.

हा आणखी एक सुंदर प्रकार पाहा. ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमांमध्येही तुम्ही ते घालून जाऊ शकता.