Latest Long Mangalsutra Designs : सणासुदीसाठी, रोजच्या वापरासाठी मोठ्या मंगळसूत्राच्या आकर्षक डिजाईन्स; पाहा लेटेस्ट पॅटर्न्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:40 PM 2022-04-06T19:40:11+5:30 2022-04-06T19:59:17+5:30
Latest Long Mangalsutra Designs : साडीवर किंवा ड्रेसवर तुम्ही अशाप्रकारचं मंगळसुत्र परिधान करू शकता. या मंगळसुत्रावरील लक्ष्मीच्या लहान लहान प्रतिमा लक्ष वेधून घेतात. भारतात प्रत्येक लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या गळ्यात मंगळसुत्र असतं. तर काही ठिकाणी संस्कृतीनुसार मंगळसुत्र घालणं बंधनकारक नसतं. रोज मंगळसुत्र नाही घातलं तरी सणासुदीला मात्र घालावंच लागतं. साडी किंवा ड्रेसला शोभेणारं मंगळसुत्र घातल्यानं लूक काही वेगळाच दिसतो. म्हणूनच या लेखात तुम्हाला मोठ्या मंगळसूत्राचे नवनवीन पॅटन्स दाखवणार आहोत. (Latest long Mangalsutra Desings)
साडीवर किंवा ड्रेसवर तुम्ही अशाप्रकारचं मंगळसुत्र परिधान करू शकता. या मंगळसुत्रावरील लक्ष्मीच्या लहान लहान प्रतिमा लक्ष वेधून घेतात. साधारणपणे १५० ते २०० रूपयांपर्यंत तुम्हाला या प्रकारच्या मंगळसुत्र डिजाईन्स उपलब्ध होतील.
गोल्डन सिल्वर कॉम्बिनेशन असलेलं मंगळसुत्र तुम्हाला शोभून दिसू शकतं. साधारणपणे १०० ते २०० रूपयांत तुम्हाला अशा डिजाईन्स मिळतील
स्वत:चं किंवा पतीचं अल्फाबेट असलेलं मंगळसुत्र तुम्ही घालू शकता. १३० पासून २०० रूपयांपर्यंत या टाईपचे मंगळसुत्र तुम्हाला सहज उपलब्ध होतील.
मंगळसुत्राच्या ब्रॅसलेटची फॅशन नेहमीच चर्चेत असते. मंगळसुत्राचं ब्रेसलेट घालत्यानंतर तुम्ही चार चौघात नेहमीच उठून दिसाल. १५० ते २०० रूपयांपर्यंत तुम्हाला हे स्टायलिश मंगळसुत्र विकत घेता येऊ शकतं.
काळ्या मण्याचं सिल्वर पेडंटचं मंगळसुत्र तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुमचा लूक अधिकच खुलून दिसेल. १०० ते २०० रुपयांपर्यंत तुम्हाला हे सिंपल सोबर मंगळसुत्र मिळू शकतं.
लग्नकार्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या समारंभासाठी तुम्ही अशा प्रकारचे दागिने घेऊ शकता. ८०० ते १८०० रूपयांपर्यंत तुम्हाला आर्टिफिशियल दागिने उपलब्ध होतील. याशिवाय तुम्ही आवडलेल्या डिजाईन्स सोन्यातही बनवून घेऊ शकता.
१०० ते २०० रूपयांपर्यंत तुम्हाला बारीक डिजाईन्सची मंगळसुत्र उपलब्ध होतील.
(Image credit- Social Media)
(Image credit- Social Media)