सौभाग्याची सुंदर खूण लग्नातला मुहूर्तमणी, पाहा मुहूर्तमणीचे सुंदर डिझाइन्स-लग्नाचा क्षण होईल खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 17:24 IST2025-04-04T17:18:45+5:302025-04-04T17:24:04+5:30

Latest Mani Mangalsutra designs: Trendy mangalsutra for brides: Mangalsutra designs 2025: Muhurat jewellery trends: Bridal mangalsutra collection: आपले देखील लग्न होणार असेल तर मुहूर्तमणीच्या काही नवीन डिझाइन्स पाहूया.

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून आपल्या घरात खरेदीची लगबग सुरु होते. अशावेळी नवरीसाठी खास असतात ते तिचे दागिने. लग्न म्हटलं की, सगळ्या गोष्टी नव्याने खरेदी कराव्या लागतात. त्यातील एक गोष्टी ती म्हणजे मुहूर्तमणी. (Latest Mani Mangalsutra designs)

हळदीत किंवा लग्नात नवरीच्या गळ्यात मुहूर्त मणी घातला जातो. याला कंठमणी असे देखील म्हणतात. हा विशुद्ध चक्राशी असणारा मुहूर्तमणी म्हणून ओळखले जाते. सुती धाग्यात ओवलेल्या काळ्या मण्यांमध्ये असतो. त्यावर वेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केले जाते. (Trendy mangalsutra for brides)

जर आपले देखील लग्न होणार असेल तर मुहूर्तमणीच्या काही नवीन डिझाइन्स पाहूया. नऊवारी, सहावारी किंवा हळदीच्या साडीवर शोभून दिसेल.

आपल्याला साधा मुहूर्तमणी हवा असेल तर आपण काळ्या मणींमध्ये ४ पदरी ओवू शकतो. यामध्ये गोल आकाराची प्लेन मणी निवडता येईल.

मोठा गोल मणी त्यावर चंदेरी रंगाची डिझाइन आणि काळ्या- सोन्याच्या छोट्या मणीने ओवलेल हे मंगळसूत्र नववधुच्या सौंदर्यात भर घालेल.

आपल्याला मुहूर्तमणीमध्ये आणखी डिझाइन्स हवी असेल तर यावर फुगाच्या शेपमध्ये असलेले हे रॉयल डिझाइन्स सुंदर आहे.

साधा आणि सिंपल मुहूर्तमणी हवा असेल तर आपण डायमंड असणारा मुहूर्तमणी आणि काळ्या मण्यांमध्ये ओवलेले मंगळसूत्र घालू शकतो.