भारतात किती प्रकारच्या भाकरी-रोटी-पराठे-पुऱ्या खाल्ल्या जातात, हे पाहा! आकार आणि चवीचा चमत्कार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:12 IST2025-04-03T19:06:53+5:302025-04-03T19:12:37+5:30
Look how many types of breads are eaten in India : भारतामध्ये भाजीतच नाही तर पोळीतही आहे भरपूर वैविध्य. प्रकार अनेक आणि चव भन्नाट.

भारतामध्ये खाद्यपदार्थांमध्ये भरपूर वैविध्य आढळून येते. भाजी, भात एवढंच काय तर कोशिंबिरींचेही पन्नास प्रकार असतील. तसेच भारतामध्ये चपातीचेही बरेच प्रकार आहेत. अर्थात त्या सगळ्या प्रकारांना चपाती म्हणता येणार नाही. त्यांना वेगवेगळी नावे आहेत. सामग्री, चव सगळेच वेगळे असते.
पुरी हा प्रकार तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पुरी तळून तयार केली जाते. पीठ पोळीसारखेच असते जरा घट्ट पातळ पुढे मागे मळावे लागते एवढाच फरक. मात्र चवीत कमालीचा फरक असतो.
नान हा प्रकार आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आवर्जून खातो. कारण चवीला नान फारच छान लागतो. मस्त बटर लाऊन तयार करतात. तसेच नानचे अनेक प्रकार आहेत. आलू नान, बटर नान, चीज नाना, गार्लीक नान, इतरही विविध प्रकार असतात.
मराठीमध्ये पोळी तसेच हिंदीमध्ये रोटी असे आपल्याला वाटते. मात्र दोन्ही प्रकार वेगळे असतात. रोटी ही आपण घरी फार कमी तयार करतो.
पंजाबी लोकांच्या मुख्य अन्नामध्ये समावेश होतो तो पाराठ्याचा. आता तर भारतभरतातून सगळेच या पराठ्यांचा आस्वाद घेतात. पराठ्यांमध्येही अनेक प्रकार आहेत. आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा इतरही अनेक आहेत.
पंजाबी लोकांच्या मुख्य अन्नामध्ये समावेश होतो तो पाराठ्याचा. आता तर भारतभरतातून सगळेच या पराठ्यांचा आस्वाद घेतात. पराठ्यांमध्येही अनेक प्रकार आहेत. आलू पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा इतरही अनेक आहेत.
महाराष्ट्रामध्ये खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भाकरी. पौष्टिक आणि पोटभरीचा हा प्रकार लोकप्रिय आहे. भाकरीचे अनेक प्रकार आहेत. पाले भाज्यांबरोबर भाकरी उत्तम लागते.
परोठा आणि पराठा सारखेच वाटले तरी ते वेगवेगळे आहेत. परोठ्याला अनेक लेअर्स असतात. कडा मोकळ्या असतात. जरा जाड असतो आणि मस्त मऊ असतो. शक्यतो रस्सा भाजी बरोबर खाल्ला जातो.
भटूरा आणि पुरी सारखे नाहीत. अनेक जण भटूऱ्याला मोठी पुरी म्हणतात. मात्र दोन्हीच्या पीठामध्ये फरक असतो. चवीमध्येही फारक असतो. भटूरा छोल्यांबरोबर खाल्ला जातो. दिल्यासारख्या ठिकाणी छोले भटूरा फार लोकप्रिय आहेत.