व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2023 05:55 PM2023-01-22T17:55:54+5:302023-01-22T18:00:50+5:30

Follow Samantha's Favourite White Colour dresses समंथावर व्हाईट कलर उठून दिसतो. जणू अप्सराच, बघा यातील कोणता लूक तुम्हाला आवडतो...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आपल्या मनमोहक अदांसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचा प्रत्येक लूक घायाळ करणारा ठरतो.

ती व्हाईट ड्रेसमध्ये खूप सोज्वळ आणि सुंदर दिसते. ती सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. तिचा अपकमिंग 'शाकुंतलम' या चित्रपटातील व्हाइट ड्रेसवरील लूक देखील व्हायरल होत आहे.

समंथा व्हाईट कलर ड्रेसमध्ये सोज्वळ, अप्सरा दिसते. तिचा व्हाईट कलरच्या साडीतला लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

व्हाईट रॉब जॅकेटमध्ये समंथा क्लासी - डिसेंट दिसत आहे. यावर तिने व्हाईट पँट परिधान केली आहे. आपण हा लूक ऑफिससाठी कॅरी करू शकता.

व्हाईट कलर पफी रफल स्लिव्हमध्ये समंथा क्यूट डॉल दिसत आहे. आपण हा तिचा हटके लूक पार्टीसाठी कॅरी करू शकता.

फ्लोईंग व्हाईट गाऊनमध्ये समंथा अप्सरा दिसत आहे. यातील तिचा सोज्वळ लूक घायाळ करणारा ठरत आहे.

ऑफिस लूकसाठी आपण व्हाईट शर्ट कॅरी करू शकता. यात तिने व्हाईट शर्टवर सिल्व्हर इयररिंग कॅरी केले आहे.

सध्या ट्रेण्डमध्ये असलेली व्हाईट ऑर्गांझा साडीत समंथा अप्रतिम दिसत आहे. यावर तिने कटआऊट ब्लाऊज परिधान केला आहे. तिचा हा मोहक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

व्हाईट सलवारमध्ये समंथा उठून दिसत आहे. यात तिने नो मेकअप लूक ठेवला असून, कानात झुमके घातले आहे. आपण हा लूक कोणत्याही कार्यक्रमात कॅरी करू शकता.

तिचा प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला "शाकुंतलम" या चित्रपटातील "मल्लिका मल्लिका" हे गाणं रिलीज झालं. यात तिने व्हाईट ड्रेस परिधान केला आहे, यासह पिवळ्या गुलाबात सजलेली समंथा खूप सुंदर आणि मनमोहक दिसत आहे.