माधुरी दीक्षितच्या साड्यांचे पाहा खास कलेक्शन, लग्नसराईत ’या’ रंंगांच्या साड्या तुमच्याकडे हव्याच..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:23 PM2024-11-30T16:23:05+5:302024-11-30T18:56:51+5:30

Madhuri Dixit Exclusive Collection Of Silk Sarees : समारंभात नेसण्यासाठी तुम्हीही माधुरी दीक्षितच्या लूकप्रमाणे काठापदराच्या साडीचा लूक करू शकता.

लग्नसराई म्हटलं की काठापदराच्या साड्या आल्याच पण प्रत्येक काठापदराच्या साडीला परफेक्ट लूक येतोच असं नाही. काठापदराची साडी सिल्कच्या कापडात खूपच उठून दिसते. (Madhuri Dixit Exclusive Collection Of Silk Sarees)

समारंभात घालण्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षितच्या लूकप्रमाणे काठापदराच्या साडीचा लूक कॅरी करू शकता.

यात येवला पैठणी, बनारसी सिल्क, कांजीवरम, असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील.

काठापदराची साडी घेताना साडीची बॉर्डर फार जाड निवडू नका. कारण यामुळे साडीचा लूक खराब होऊ सकतो. बारीक बॉर्डर चांगली दिसते.

काठापदराच्या मटेरियलमध्ये तुम्ही नऊवारी साडीसुद्धा निवडू शकता.

माधुरी अनेकदा कॉस्ट्रास्ट ब्लाऊज असलेले रंग निवडते तुम्ही कॉन्ट्रास्ट साडीचे पॅटर्न निवडू शकता.

पिवळ्या साडीला लाल बॉर्डर हे कॉम्बिनेशनही शोभून दिसेल.

(Image Credit- Social Media)