माधुरी दीक्षित ते आलिया भट, पाहा सुंदर लेहेंगा कलेक्शन! एक से एक सुंदर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 20:47 IST2025-04-17T20:40:24+5:302025-04-17T20:47:13+5:30
Madhuri Dixit to Alia Bhatt, See the Beautiful Lehenga Collection : लेहेंगा हा प्रकार अगदीच सुंदर दिसतो. काही सुंदर पॅटर्न पाहा.

भारतीय पेहराव फार सुंदर दिसतात. काही सण असले किंवा कार्यक्रम असले की आपण विविध प्रकारचे ड्रेस वापरतो. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे लेहेंगा. प्रत्येक महिलेवर लेहेंगा सुंदरच दिसतो.
त्यामध्ये विविध प्रकारही असतात तसेच रंग तर भरपूर असतात. माधुरी ते आलिया कोणाचा लेहेंगा तुम्हाला आवडतो ते पाहा. त्यानुसार येत्या सणांसाठी नक्की शिऊन घ्या. किंवा विकत आणा.
आलिया भटने घातलेला हा लेहेंगा अगदी साधा आणि छान आहे. दोन फेंट रंगांचे कॉम्बिनेशन फारच सुंदर वाटते. तसेच पिवळा व आकाशी फार कॉमन असे कॉम्बिनेशन नाही. पण दिसायला सुंदरच दिसते.
कियारा अडवाणीचे लेहेंगा कलेक्शन फार सुंदर आहे. त्यापैकीच एक म्हणजे हा पांढरा लेहेंगा. त्यावर छान पिवळी ओढणी. हा पॅटर्न जरा हटके आहे. संगीतसाठी अगदीच मस्त.
माधुरी दीक्षित कायमच सुंदर दिसते. तिचे कपडे अगदी अंग झाकलेले असतात तरी ती हॉट दिसते. माधुरीचा हा हिरवा लेहेंगा अगदीच कमाल आहे.
दिपिकाने घातलेला हा जरीचा लेहेंगा अगदी सुंदर आहे. असा लेहेंगा शिऊन घेणे कोणालाही नक्कीच शक्य आहे इतका तो साधा आहे तरीही प्रचंड सुंदर दिसतो.
श्रीदेवीचा हा गुलाबी लेहेंगा नक्कीच कोणी विसलेले नाही. तिचे फोटो फार व्हायरल झाले होते. आणि लोकांना तिचा पेहराव प्रचंड आवडला होता.
मलायका अरोराचा हा लूक फारच सुंदर आणि मनमोहक आहे. तिने घातलेला लेहेंगा कमाल आहे. रंगही जरा वेगळा आहे.
माधुरीचा हा हटके लेहेंगा जेवढा साधा आहे तेवढाच सुंदर. लग्न कार्यासाठी अगदीच मस्त दिसेल.