'तू माझ्यासाठी जे काही केलंस..' धक धक गर्ल माधुरीच्या आईचं निधन; मायलेकींच्या खास आठवणी पाहा न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:17 AM2023-03-12T11:17:43+5:302023-03-12T11:42:49+5:30

Madhuri Dixit's mother Snehlata Dixit dies at 91: 'मी आज जी काही आहे आणि भविष्यात जी काही असेल

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले. आईच्या जाण्यानं माधुरी आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीसाठी तिची आई सर्वकाही होती. (Madhuri Dixit's mother Snehlata Dixit passes away at 91)

माधुरीचा जन्म मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात झाला. स्नेहलता आणि शंकर दीक्षित यांच्या लाडक्या लेकीनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

स्नेहलता दीक्षित या भेंडीबाझार घराण्यातील गायिका होत्या. गुलाब गँग या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी प्रथमच आवाज दिला होता.

गेल्या वर्षी, आईच्या 90 व्या वाढदिवसाच्या दिवशी, माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर एक प्रेमळ नोट लिहिली होती. "वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रत्येकजण म्हणतो की आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण आहे.

तू माझ्यासाठी जे काही केले आहेस, तू जे काही शिकवले आहेस ते माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. देव तुला चांगले आरोग्य देवो. तुला अधिक आनंदाच्या शुभेच्छा!" माधुरीने लिहिले.

मदर्स डे च्या दिवशी फोटो शेअर करताना माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी आज जी काही आहे आणि भविष्यात जी काही असेल, ती प्रत्येक गोष्ट तुझेच प्रतिबिंब असेल. मदर्स डेच्या शुभेच्छा.'

या पोस्टमध्ये माधुरी तिच्या दोन्ही बहिणींसह काळ्यात ड्रेसमध्ये दिसून आली.

अभिनेत्रीच्या एका बहिणीचे नाव रूपा आणि दुसऱ्या बहिणीचे नाव भारती आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनी या फोटोवर कमेंट करून अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबावरचे प्रेम व्यक्त केले.