महाशिवरात्र स्पेशल : पाहा १० सुंदर आकर्षक रांगोळ्या - चटकन काढता येतील अशा झटपट डिझाइन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 03:37 PM2024-03-05T15:37:28+5:302024-03-05T16:46:09+5:30

Maha Shivratri Rangoli Design : तुमच्याकडे फार वेळ नसेल तरीही तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता.

महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण भारतभरात असतो. यावर्षी ८ मार्चला (Mahashivratri 2024) महाशिवरात्रीचे पर्व साजरे केले जाणार आहे. याशिवाय भगवान शिवाचे उपासक शिव शंकराची पूजा-आराधना करतात. या निमित्ताने घरात देव्हाऱ्याजवळ किंवा बाहेर अंगणात तुम्हाला रांगोळ्या काढायच्या असतील तर तुम्ही या सरळ, सोप्या डिजाईन्स ट्राय करू शकता.( Mahashivratri Rangoli Designs Easy And Beautiful)

महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्व अधिक असते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तांदूळ किंवा पांढऱ्या फुलांचा वापर करून सुंदर रांगोळी काढू शकता.

शिवलिंगाची गोल डिजाईन बनवण्यासाठी तुम्ही गोल झाकणाचा वापर करू शकता. शिवलिंगावरची डोळ्यांची डिजाईन तयार करण्यासाठी निळ्या रंगाचा वापर करा.

तुमच्याकडे फार वेळ नसेल तरीही तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही फुलांची रांगोळी काढू शकता. लाल पांढऱ्या फुलांनी रांगोळी उठून दिसेल.

शिवलिंगावर बेलपत्र चढवणं शुभ मानलं जातं तुम्ही रांगोळी काढताना हिरव्या रंगाने बेलाचे पान काढून त्यावर डिजाईन काढून शकता.

शिवलिंगाची छोटी रांगोळी काढून तुम्ही त्या खाली ओम नम: शिवाय असं लिहू शकता.

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तांब्याच्या थाळीत शिवलिंगाची डिजाईन तयार करून महादेवाच्या समोर ठेवू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला जास्तवेळही लागणार नाही.

एकाच रांगोळीत तुम्ही त्रिशूळ, डंबरू आणि शंकराची पिंड काढू शकता.

शंकराच्या पिंडीच्या अवतीभवती रुदाक्षांची माळ काढू शकतात आणि गोल किंवा चौकोन काढून चारही बाजूंनी सजवा.

पिवळ्या रंगाचा वापर करून तुम्ही पिंडीच्या वरच्या बाजूला सुर्याची डिजाईन काढू शकता.