Maharashtrian street food vadapav named among best 20 sandwiches in the world
जगभरातल्या टॉप २० सॅण्डविचमध्ये वडापावने मारली बाजी!! पण काही खवय्ये मात्र नाराज.... कारण By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 05:02 PM2024-03-11T17:02:19+5:302024-03-11T17:06:35+5:30Join usJoin usNext महाराष्ट्रातल्या स्ट्रिटफूडबाबत आपण जेव्हा बोलतो, तेव्हा वडापावला टाळून पुढे जाताच येत नाही. खरोखर लागलेली भूक असो, छोटीशी भूक असो किंवा मग टाईमपास म्हणून काहीतरी खायचं असो... स्वस्तात मस्तं आणि खमंग- चवदार पदार्थ म्हणजे वडापाव. वडापावची लोकप्रियता आता थेट जगभरातच पोहोचली आहे. म्हणूनच तर tasteatlas यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये आपल्या मराठमोळ्या वडापावने बाजी मारली आहे. tasteatlas यांनी जगभरातील प्रसिद्ध सॅण्डविचची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये जगभरात वेगवेगळ्या प्रांतात मिळणाऱ्या ५० प्रसिद्ध सॅण्डविचचा समावेश आहे. या यादीमध्ये १९ व्या स्थानावर वडापावचा उल्लेख असून त्याला ४. ३ रेटिंग मिळालं आहे. वडापावला अशी जागतिक स्तरावर ओळख मिळणे ही आनंदाचीच बाब आहे. पण तो काही सॅण्डविचचा प्रकार नाही. तो एक वेगळा आणि स्वतंत्र पदार्थ आहे, असं काही खवय्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? वडापावला असं सॅण्डविच म्हणणं योग्य का?टॅग्स :सोशल व्हायरलअन्नSocial Viralfood