मकर संक्रांत: काळ्या साडीवर करा सुपर स्टायलिश लूक! ७ टिप्स, सगळ्यांमध्ये तुम्हीच उठून दिसाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 12:59 IST2025-01-07T12:54:00+5:302025-01-07T12:59:53+5:30

मकर संक्रांत आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे काळ्या साडीवर कोणते दागिने घालावेत, हेअरस्टाईल कशी करावी, ब्लाऊज कसं असावं असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या काही अभिनेत्रींचे काळ्या साडीमधले सुंदर लूक पाहा आणि तुमचा संक्रांत स्पेशल लूक कसा करायचा ते ठरवून टाका..

हल्ली प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन ऑफिसमध्येही केलं जातं. आता संक्रांतीला बऱ्याच ठिकाणी सुटी नसते. त्यामुळे तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला ऑफिसमध्ये संक्रांतीनिमित्त खास काळी साडी नेसून जायचं असेल तर असा स्टनिंग लूक करू शकता.

एकदम ट्रॅडिशनल लूक करून हळदी- कुंकू कार्यक्रमाला किंवा तिळगूळ घ्यायला जायचं असेल तर हा एक लूक सुंदर आहे..

काळ्या साडीवर बऱ्याचदा ऑक्सिडाईज दागिने शोभून दिसतात. त्यामुळे तुमच्याकडे नसतील तर यानिमित्ताने ऑक्सिडाईज दागिने नक्की घ्या..

थोडा ट्रेण्डी लूक करायचा असेल तर अशा पद्धतीने दागिन्यांची निवड करा. त्यात जर तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं तर तुमचा लूक आणखी आकर्षक होईल.

संक्रांतीच्या दिवशी ऑफिसला जायचं असेल तर अशा पद्धतीचा लूकही तुम्ही करू शकता.. सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसाल.

काळ्या साडीतला सई ताम्हणकरचा हा एक क्लासी लूक पाहा. तिने फक्त मोठे कानातले घातले आहेत. तरी सुद्धा तिचा लूक कम्प्लिट वाटतो. असं काही ट्राय करून पाहायला हरकत नाही.

काठपदर साडी नेसून ट्रॅडिशनल लूक करायचा असेल तर असं काही तुम्ही करू शकता. केसांचा अंबाडा आणि गळ्यात मोत्याचे किंवा ऑक्सिडाईज दागिने तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावतील..