मकर संक्रांत स्पेशल :वाण म्हणून वेगळं काय द्यायचं प्रश्न पडला? पाहा नेहमीपेक्षा वेगळे ८ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 09:45 AM2024-01-12T09:45:35+5:302024-01-12T15:01:31+5:30

Makar Sankranti Different Van Options :

संक्रांतीच्या हळदीकुंकवाला वाण म्हणून नेहमी त्याच त्या वस्तू काय द्यायच्या असा प्रश्न पडला असेल तर आज आपण काही हटके पर्याय पाहणार आहोत (Makar Sankranti Different Van Options).

पॉकेट परफ्यूम किंवा अत्तर ही स्त्रियांना प्रवासात आवश्यक असणारी गोष्ट आपण नक्कीच देऊ शकतो.

एखादं फुलाचं किंवा शोभेचं इनडोअर प्लांट हाही वाण म्हणून देण्यासाठी छान पर्याय असू शकतो.

महिलांचा आहार आणि आरोग्य उत्तम असावे यासाठी निवडलेली पालेभाजी दिल्यास त्या झटपट ही भाजी करुन खाऊ शकतात.

बऱ्याचशा महिलांची हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. अशावेळी खजूर किंवा काळे मनुके दिल्यास महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला पर्याय होऊ शकतो.

रोपांच्या बिया हाही वाण म्हणून देण्यासाठी चांगला पर्याय आहे. या बिया लावून छान रोप फुलू शकतं.

बॉडी लोशन किंवा लिप ग्लॉस या थंडीच्या दिवसांत आवश्यक असणाऱ्या गोष्टी दिल्यास त्या नक्कीच वेगळ्या आणि उपयुक्त ठरु शकतात.

प्रवासात किंवा ट्रिपला गेल्यावर महिलांना आवर्जून लागणारी गोष्ट असते ती म्हणजे आरसा. लहानसा एखादा डिझायनर आरसा दिल्यास महिला नक्कीच खूश होऊ शकतात.

पाऊच हाही महिलांना विविध गोष्टी ठेवण्यासाठी लागणारी गोष्ट. बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, किंमतीचे पाऊच मिळतात हे पाऊच वाण म्हणून चांगला पर्याय ठरु शकतात.