Makar Sankranti Special : तुमच्याकडे हवाच एक तरी काळा डिझायनर-स्टायलिश दुप्पटा, मिळेल ग्लॅमरस लूक- पाहा काळ्या दुपट्ट्याचे सुंदर प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 04:14 PM2023-01-13T16:14:29+5:302023-01-13T16:55:00+5:30

Makar Sankranti Special Dupatta Patterns for Shopping : काळा दुपट्टा आपण कशावरही मिस मॅच करु शकतो. अतिशय सुंदर लूक मिळतो, मिनिमल फॅशनचा नवा ट्रेण्ड.

संक्रांत सण म्हणजे आपण आवर्जून काळे कपडे घालतो. पण तुम्हाला काळी साडी किंवा ड्रेस नको असेल तर तुम्ही काळ्या रंगाचा दुपट्टा घेऊनही तुमचं सौंदर्य खुलवू शकता. पाहूया अशाच काळ्या दुपट्ट्याचे एकसे एक प्रकार

काळा रंग हा कोणावरही आणि कोणत्याही रंगावर खुलून दिसणारा रंग आहे. तुम्ही एखादा प्लेन काळा ड्रेस घातला तर त्यावर घेता येईल असा सिंपल पण फ्लोरल प्रिंटचा शिफॉन कापडातील दुपट्टा तुम्ही नक्की कॅरी करु शकता. यावर काळ्या ड्रेसशिवाय इतरही रंगाचे प्लेन ड्रेस छान दिसतात.

काळ्या रंगावर पांढऱ्या रंगाचे सेल्फ प्रिंट असलेला हा कॉटन दुपट्टा आपला लूक एकदम बदलून टाकतो. ऑफीस वेअर किंवा फॉर्मल वेअर म्हणून अशाप्रकारचा दुपट्टा आपण नक्की ट्राय करु शकतो. खादी प्रकारात येणारा हा दुपट्टा थंडीच्या दिवसांत उबदारही असतो.

कांजीवरम प्रकारातील साडी आपण ट्राय केलेली असते. पण याच प्रकारात दुपट्टाही मिळतो. त्यामुळे साडी न नेसता तुम्हाला पारंपरिक लूक कॅरी करायचा असेल तर हा चांगला ऑप्शन आहे. बाजारात यामध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

दोरा वर्क हे अतिशय कलाकुसरीचे काम असून या प्रकारातील साड्या, ड्रेस यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंटमध्ये येणारे या प्रकारातील दुपट्टे प्लेन पंजाबी सूटसोबत अतिशय मस्त पेअर करता येतात. काळ्या रंगावर पांढऱ्या किंवा वेगवेगळ्या रंगाच्या दोऱ्यांचे काम छान दिसते.

तुम्हाला थोडं फॅशनेबल किंवा डीझायनर वेअर असा दुपट्टा हवा असेल तर थोडा वर्क केलेला. लटकन, लेस, टिकल्या लावलेला नेटचा दुपट्टा हा पर्याय चांगला आहे. वजनाला हलका असल्याने हा दुपट्टा कॅरी करणेही सोपे असते.

लखनवी प्रमाणे हेवी वर्क असलेला हा दुपट्टा फार छान दिसतो. यामध्ये शिफॉन आणि कॉटन असे २ प्रकार पाहायला मिळतात. आरसे किंवा टिकल्या वर्क केलेले हे दुपट्टे डिझायनर प्रकारात मोडतात. हा दुपट्टा असल्यावर ड्रेस साधा असेल तरी लूक एकदम बदलून जातो.

बनारसी सिल्क हा आपल्याकडे सणावारांना अवर्जून वापरला जाणारा प्रकार. साडी, ड्रेस, अनारकली अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये असणाऱ्या बनारसी कापडाचे दुपट्टेही फार छान दिसतात. हेवी प्रकारातील हे दुपट्टे घेतल्यावर आपला लूकच बदलून जातो.