Makar Sankranti : लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला हवाच हलव्याच्या दागिन्यांचा साज, पाहा एकसेएक सुंदर डिझाईन्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 14:14 IST2025-01-11T13:56:41+5:302025-01-11T14:14:08+5:30
Makar Sankranti Special Halwyache Dagine For Women : Tilgul jwellery set or Halwyache dagine for women : Sankranti special- Halwyache dagine : Jewellery for makar sankranti : संक्रांतीला घाला हलव्याचे अप्रतिम देखणे दागिने

नवीन वर्षातील पहिलावहिला सण म्हणजे (Jewellery for makar sankranti) मकरसंक्रांती. महाराष्ट्रात मकरसंक्रांती दिवशी सुगड पूजन केले जाते सोबतच तिळगुळ देत पतंग उडवली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांत (Makar Sankranti Special Halwyache Dagine For Women) हा सण खास असतो. या दिवशी नव्या जोडप्याचे कौतुक केले जाते. सासरी सुन आणि जावयाचे लाड होतात. मकरसंक्रांती दिवशी नव्या सुनेला हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. हलव्यापासून म्हणजेच फुटाण्यापासून मंगळसूत्र, नथ, चिंचपेटी, बांगड्या, बाजूबंद बनवले जातात. महिला आणि पुरूष मकर संक्रांतीदिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हे हलव्याचे दागिने घालतात. हलव्यापासून तयार केलेले कोणते दागिने महिलांना घालता येतील ते पाहूयात.
१. नथ :-
पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या तिळगुळापासून तयार केलेली नथ नाकात अगदी छान शोभून दिसते.
२. बांगड्या :-
काळ्या साडीवर उठून दिसणारा हा पांढरा हलवा या दिवसाची रंगत वाढवतो आणि आपल्या सौंदर्यात भरच पाडतो. आपण हातात बांगड्या घालण्याऐवजी हिरव्या चुड्यासोबत या हलव्याच्या बांगड्या देखील घालू शकतो. हातातल्या बांगड्यांप्रमाणेच पाटल्या आणि तोडे देखील अगदी सहज विकत मिळतात.
३. बाजूबंद :-
एरवी आपण दंडात वेगवेगळ्या प्रकारचे बाजूबंद घालतो. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हलव्यापासून तयार केलेला सुंदर आणि नाजूक बाजूबंद घालू शकतो.
४. कंबरपट्टा :-
रंगीबेरंगी तिळगुळाचा वापर करून अगदी भरीव असा कंबरपट्टा काळ्या रंगाच्या साडीवर अधिक शोभून दिसतो.
५. चिंचपेटी :-
गळ्यात आपण हलव्याची चिंचपेटी देखील घालू शकतो. यामुळे गळा अधिक भरीव आणि छान दिसतो.
६. मंगळसूत्र :-
गळ्यातील इतर दागिन्यांप्रमाणेच हलव्याचे मंगळसूत्र देखील अतिशय उठून दिसते.
७. झुमके :-
आपण कानात देखील हलव्याचे दागिने घालू शकता. कानात आपण आपल्या आवडीप्रमाणे हलव्याचे बसके किंवा झुमके कानातले प्रकार घालू शकतो.
८. अंगठी :-
इतर दागिन्यांप्रमाणेच आपण बोटांत नाजुकशी हलव्याची अंगठी देखील घालू शकतो.