अजबच आहे राव! ना कोणता पुरूष ना कशाची कटकट; इथं फक्त महिलांचीच सत्ता; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:37 PM 2021-06-21T18:37:57+5:30 2021-06-21T20:18:17+5:30
matriarchal society in estonia european island : या ठिकाणी मासेमारी आणि शिकारीमुळे पुरूष कित्येक महिने घरापासून लांब राहतात. खूप कमी वेळात महिलांनी या बेटावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. जगभरातील अनेक देशांमध्ये पितृसत्ताक संस्कृती पाहायला मिळते. पितृसत्ताक म्हणजेच अशी व्यवस्था जिथं राजनैतिक, आर्थिक, सामाजिक गोष्टींमध्ये पुरूषांचा दबदबा पाहायला मिळतो. याऊलट महिलांना आपलं खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य जगण्यासाठी झगडत राहावे लागते.
युरोपच्या एका बेटावर संपूर्ण उलटं चित्र पाहायला मिळतं. एस्टोनियाच्या बाल्टीक समुद्राजवळ किन्ह्यू बेटावर चार गावं आहेत. जवळपास ७०० ते १००० लोक या गावात राहतात. याठिकाणी हॉटेल्सची कोणतीही सुविधा नाही. तरीसुद्धा जगभरातील लोक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. ही जागा पूर्णपणे महिलाच चालवतात.
किन्ह्यू बेटाला युरोपातील सगळ्यात शेवटची मातृसत्ताक सोसायटी मानलं जातं. याशिवाय महिलांचे बेट असंही म्हटलं जातं. याठिकाणी मासेमारी आणि शिकारीमुळे पुरूष कित्येक महिने घरापासून लांब राहतात. खूप कमी वेळात महिलांनी या बेटावर आपलं वर्चस्व निर्माण केलं.
आपल्या मुलांचे संगोपन करण्याशिवाय इथल्या महिला शेती, पारंपारिक शिवणकाम, हस्तकला करतात. याशिवाय बेटाशी निगडीत काही संस्थांचे कामही पाहतात. लग्नांपासून, अंतिम संस्कारांपर्यंत या ठिकाणच्या महिला जबाबदारीचे आपसात वाटप करतात.
या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या महिलांनी इंडिपेंडंट वेबसाईटशी बोलताना सांगितले की, अनेकांना वाटतं की मातृसत्ताक समाजाच्या माध्यमातून आम्हाला काही संदेश द्यायचा आहे. खरं पाहता गेल्या अनेक दशकांपासून इथल्या महिला एकट्याच राहत आहेत. अशा प्रकारच्या जगण्याव्यतिरिक्त दुसरं जीवन जगण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.
या बेटावरील रहिवासी असलेली सिल्विया नावाची महिला एक नृत्य प्रक्षिक्षक आणि फोटो ग्राफर आहेत. काही वर्षांपूर्वी ही महिला कॅनडातून किन्ह्यूमध्ये आली. द्वितीय महायुद्धादरम्यान सिल्विया हा बेट सोडून निघून गेल्या होत्या. काही वर्षांनी त्या पुन्हा इथे राहायला आल्या असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
सिल्विया यांना तेथिल पर्यटनाला पाठिंबा द्यायला आहे. त्यांच्यामते जुन्या काळातले लोक पर्यटनाला खास पाठींबा देत नव्हते. (All Image Credit- Getty Images)