12th फेल सिनेमामुळे नॅशनल क्रश बनलेली मेधा शंकर, नेमकी कुठली? कशी झाली अभिनेत्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 01:01 PM2024-01-10T13:01:29+5:302024-01-10T13:17:11+5:30

Meet '12th Fail' Actress Medha Shankar, Who Has Become Internet's New Crush : नॅशनल क्रश मेधाला बनायचं होतं डॉक्टर झाली अॅक्टर, फेसबुकच्या फोटोमुळे मिळाला होता सिनेमा

आयपीएस मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांच्या जीवनावर आधारित 12th Fail या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट अनुराग पाठक यांच्या 12th Fail या पुस्तकावर आधारित असून, त्यांचा खडतर पण प्रेरणादायी प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) झळकला असून, त्याच्या ऑपोझीट मेधा शंकर (Medha Shankar) हिने साकारलेली श्रद्धा जोशीची भूमिका प्रेक्षकांना भावली(Meet '12th Fail' Actress Medha Shankar, Who Has Become Internet's New Crush).

मेधाने साकारलेल्या दमदार सर्पोटिव्ह पार्टनरच्या भुमिकेमुळे ती रात्रोरात प्रकाशझोतात आली. शिवाय निखळ सौंदर्यामुळे नेटकरी तिला आज नॅशनल क्रश (National Crush) म्हणत आहेत. पण मेधा नक्की आहे तरी कोण? तिचं शिक्षण किती झालं? 12th Fail या चित्रपटाप्रमाणे तिचाही प्रवास खडतर होता का? पाहूयात.

मेधा शंकरचा जन्म नोएडा येथे झाला. मेधा फक्त अभिनेत्री नसून, एक उत्कृष्ट गायक आणि मॉडेल देखील आहे. तिने दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स ही पदवी मिळवली तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी संपादित केली. तिच्या वडिलांचे नाव अभय शंकर असून, ते उद्योगपती आहेत. तर, आई रचना राज शंकर या उत्तम कोरिओग्राफर होत्या. तर तिच्या भावाचे नाव अपूर्व शंकर आहे.

मेधाला लहानपणापासून गायन आणि नृत्याची आवड होती. तिने हिंदुस्थान शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतले आहे. मेधाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग आणि टीव्ही जाहिरातींमधून केली. २०१५ साली प्रदर्शित झालेला 'विथ यू फॉर यू ऑल्वेज' या शॉर्ट फिल्मद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

२०१९ साली मेधाने ब्रिटिश टेलिव्हिजन मालिका बीचम हाऊसमध्ये रोशनाराची भूमिका साकारली होती. तर शादिस्थान या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. शिवाय डिज्नी प्लस हॉटस्टारवरील ‘दिल बेकरार’ ही वेब सिरीज देखील तिची उत्तम गाजली. पण तिला खरी ओळख 12th Fail या चित्रपटातून मिळाली.

शादिस्थान मेधाचा पाहिला चित्रपट. हा चित्रपट मिळण्यामागे देखील एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. पहिला चित्रपट कसा मिळाला याबद्दल एका मुलाखतीत बोलताना मेधा म्हणाली, '२०१८ मध्ये एक फोटो फेसबुकवर ठेवला होता. शादीस्थान या चित्रपटाचं कास्टिंग करणाऱ्या राज सिंह चौधरी यांनी फेसबुकवरील माझा प्रोफाइल फोटो पाहिला. शिवाय त्यांनी 'बीचम हाऊस' या चित्रपटातील काही फोटोही पाहिले.

या चित्रपटात लारा दत्ता या अभिनेत्रीने काम केलं होतं. लारा दत्ता राज सिंह चौधरी यांची लहानपणीची मैत्रीण आहे. राज यांनी लगेच लारा दत्ताला फोन केला आणि माझ्याबद्दल विचारले. तेव्हा लाराने अभिनयाचं कौतुक केलं. नंतर राज यांनी शादीस्थान ऑडिशनसाठी बोलावलं'

अभिनेत्री मेधा हिला नृत्य आणि गायनाची आवड तर होतीच, पण तिला या क्षेत्रात नसून, डॉक्टर बनायचे होते. पण कॉलेजच्या एका मित्राच्या सांगण्यावरुन तिने त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी ऑडिशन दिलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचं ठरवलं.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th Fail या चित्रपटाचं केवळ प्रेक्षक-समिक्षकांकडून नाही तर सेलिब्रिटींकडून कौतुक करण्यात येत आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, सध्या ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. या चित्रपटात विक्रांत, मेधा व्यतिरिक्त संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.