Milind Soman Birthday : ५७ व्या वर्षी सुपरफिट दिसणारा मिलिंद सोमण खातो तरी काय? सिम्पल 'डाएट प्लॅन'ची कमाल..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 02:08 PM2022-11-04T14:08:50+5:302022-11-04T14:35:30+5:30

Milind Soman Birthday : मिलिंदच्या म्हणण्यानुसार तो सकाळी उठून ५०० मिली साधं पाणी पितो. सकाळी १० वाजता नाश्ता करतो. यामध्ये ड्रायफुट्स, एक पपई, एक खरबूज आणि काही सिजनल फ्रुट्सचा समावेश असतो.

एक्टर आणि सुपरमॉडेल मिलिंद सोमणला (Milind Soman) भारताचा आयर्न मॅन म्हटलं जातं. भारतात क्वचित कोणी सिलेब्रिटी या वयात इतका फिट अॅण्ड फाईन असेल. (Milind Soman Birthday) आज त्याचा ५७ वा वाढदिवस आहे. वय फक्त एक नंबर आहे हे मिलिंद सोमणनं वेळोवेळी दाखवून दिलं आहे. मिलिंद सोमणचा फिटनेस जबरदस्त असून सोशल मीडियावर त्याला लाखो लोक फॉलो करतात. (Milind Soman's Fitness Secret)

त्याचे फॅन्स बरेच आहेत. फॅन्सना फक्त त्याचे गुड लुक्स आवडत नाही तर त्याचा फिटनेससुद्धा अनेकांना आकर्षित करतो. मिलिंद नेहमीच आपल्या आवडत्या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अनेकदा त्यानं आपलं डाएट चाहत्यांसह शेअर केलं आहे. (Milind Soman shares what he eats in a day, from breakfast to dinner)

काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये मिलिंदनं सांगितलं होतं की तो दिवसाची सुरूवात कशी करतो. त्याला त्याच्या फॅन्सनी अनेकदा हा प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी पूर्ण डाएट प्लॅन शेअर केला.

मिलिंदच्या म्हणण्यानुसार तो सकाळी उठून ५०० मिली साधं पाणी पितो. सकाळी १० वाजता मिलिंद नाश्ता करतो. यामध्ये ड्रायफुट्स, एक पपई, एक खरबूज आणि काही सिजनल फ्रुट्सचा समावेश असतो. लंच मिलिंद २ वाजेपर्यंत घेतो. यामध्ये ते डाळभात, खिचडी असे पदार्थ असतात. या खिचडीमध्ये लोकल आणि सिजनल भाज्या असतात. खिचडीमध्ये २ चमचे तूप घातलेलं मिलिंदला आवडतं.

दुपारच्या जेवणात भाताऐवजी चपातीचा समावेश असतो. ६ चपात्या आणि डाळ जेवणात असते. याव्यतिरिक्त थोडं मटन, चिकन, अंडीसुद्धा मिलिंद खातो. संध्याकाळी ५ वाजता मिलिंद कपभर काळा चहा घतो. चहात गोडवा येण्यासाठी मिलिंद त्यात गुळ मिसळतो. डिनर मिलिंद ७ वाजता नंतर करतो. यात ते एक प्लेट भाजी असते. जास्त भूक लागली तर मिलिंद खिचडी खाणं पसंद करतो.

दिवसाच्या शेवटी तो पाण्यात हळद मिसळून पितो. मिलिंदच्या म्हणण्यानुसार तो कोणतीही मिठाई खातो त्यात गुळाचा वापर असतो. मिलिंद कोणतेही सप्लिमेंट आणि एक्स्ट्रा व्हिटामीन घेत नाही.

तो भरपूर पाणी पितो पण थंडपाणी कधीच पीत नाही. लॉकडाऊन दरम्यानही मिलिंदनं हेच रुटीन फॉलो केलं होतं.

त्या त्या ठिकाणच्या स्थानिक भाज्या, फळं खायला मिलिंद प्राधान्य देतो.