गुड कोलेस्टेरॉलची पॉवरहाऊस आहे 'ही' चटणी; रोज १ चमचा खा, हृदय राहील निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 01:50 PM2024-09-30T13:50:54+5:302024-09-30T19:49:41+5:30

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत कोलेस्टेरॉल आणि बीपी वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. नेहमी तेलकट पदार्थ खाल्ल्याने, वेळेवर न जेवल्यानं शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागतं. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढू लागते तेव्हा गुड कोलेस्टेरॉल आपोआप कमी होऊ लागते.

गुड कोलेस्टेरॉल जेव्हा शरीरात जास्त असते तेव्हा घाणेरडं कोलेस्टेरॉल वितळून पुन्हा लिव्हरमध्ये जाते आणि विष्ठेच्या माध्यमातून बाहेर निघते.

जर शरीराच्या आर्टरीज आणि नसांमध्ये घाणेरडं कोलेस्टेरॉल जमा झालं असेल तर चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा.

रोजच्या जेवणात चविष्ट चटणीचा समावेश करू शकता. ज्यामुळे नसा आणि आर्टरीज स्वच्छ राहतील आणि गुड कोलेस्टेरॉल वाढेल.

यासाठी आहारात पुदिना, धणे, लसूण, लिंबू, आंबा, चिया सिड्स आणि फ्लेक्स सिड्स घ्यायला हवेत.

हे सर्व पदार्थ काळं मीठ घालून दळून घ्या. ही चटणी तुम्ही पाण्यात मिसळून खाऊ शकता.

तुम्ही यात शेवग्याची पानं घालू शकता. ही चटणी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम आहे. तसंच तब्येतीसाठीही उत्तम आहे.