मौनी रॉय फिट राहण्यासाठी करते योगसाधना, पाहा फोटो - कमालीचा फिटनेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2023 06:36 PM2023-01-15T18:36:54+5:302023-01-15T18:42:16+5:30

Mouni Roy Fitness Secret - Yoga मौनी रॉय आपल्या बोल्ड अदाकारीसाठी ओळखली जाते. तिने नुकतंच स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी योग करत असल्याचे सांगितले.

"नागीण" फेम मौनी रॉयने अल्पवधीतच प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. तिने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिचा हॉट आणि बोल्ड लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो.

मौनी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी योग यासह डान्स करते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात. ती आपल्या न्यू प्रोजेक्ट यासह फोटोशूटचे फोटो शेअर करते. तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

अभिनेत्री मौनी रॉयची फिगर सर्वांना आकर्षित करते. तिचा फिटनेस पाहून प्रत्येक स्त्रीला अशी फिगर मिळावी अशी इच्छा होते.

मौनी तिच्या परफेक्ट फिगरसाठी खूप मेहनत घेते. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना तिने सांगितले की, ती फिटनेस मेन्टेन ठेवण्यासाठी योगाची कशी मदत घेते.

नियमित योगा केल्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडले. योगासने केल्याने मन शांत राहते. तसेच शरीर तंदुरुस्त राहते. मौनी रॉयसारखी फिगर बनवण्यासाठी आपण देखील योगाचे टिप्स फॉलो करू शकता.

अभिनेत्री सूर्यक्रिया, अष्टांग योग, हठयोग इत्यादींचाही सराव करते. अशाप्रकारे, तुम्हीही हा योग करून मौनी रॉयसारखी परफेक्ट फिगर मिळवू शकता.

मौनी नुकतीच ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसून आली होती. तिच्या पाईपलाईनमध्ये सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.